AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजधानी दिल्लीतील आमदार कोट्याधीश ! , किती मिळतो आमदार निधी पाहा ? आकडा पाहाल तर विश्वास बसणार नाही

देशाच्या प्रत्येक राज्यातील विधानसभा मतदार संघांच्या विकासासाठी तेथील जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. आमदाराने पदभार स्वीकारल्यानंतर, राज्य सरकार त्या भागाच्या विकासासाठी आमदाराला वेगवेगळे निधी मंजूर करते. आमदार निधी देखील त्यापैकी एक आहे, तर मग दिल्लीत आमदार निधी किती आहे आणि इतर राज्यांत काय परिस्थिती आहे पाहूयात 

राजधानी दिल्लीतील आमदार कोट्याधीश ! , किती मिळतो आमदार निधी पाहा ? आकडा पाहाल तर विश्वास बसणार नाही
| Updated on: Feb 08, 2025 | 4:06 PM
Share

केंद्र शासित प्रदेश असलेल्या राजधानी दिल्लीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगर पालिका असे तिघांचे शासन चालते. या दिल्लीच्या राज्य विधीमंडळात आपचे नेते विधानसभा निवडणूक हरले आहेत. सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या केजरीवाल यांना हॅटट्रीक काही मारता आली नाही. दिल्लीत डबल इंजिन म्हणजे भाजपाची सरकार येत आहे. तुम्हाला एका गोष्टीची कल्पना आहे का दिल्लीतील आमदारांना देशात सर्वाधिक आमदार निधी मिळतो. आम आदमी पार्टीनेच दिल्ली विधानसभा स्थानिक क्षेत्राचा आमदार निधी १० कोटीहून १५ कोटी केला होता. देशात सर्वाधिक आमदार निधी आहे. देशात इतर राज्यात किती आमदार निधी मिळतो ते पाहूयात…

आमदार निधी काय असतो ?

देशातील नागरिक स्थानिक विकासासाठी आमदारांना निवडून आणते. आमदार पदभार स्वीकारल्यानंतर राज्य सरकार आमदारांना त्यांना विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळा फंड उपलब्ध करत आहे. त्यातील मुख्य फंड आणि आमदार निधी असतो. सरकारच्या वतीने सर्व आमदारांना समान रुपाने हा निधी दिला जात असतो.

आमदार निधी किती मिळतो?

निवडणूक जिंकल्यानंतर सरकारची स्थापना झाल्यानंतर विधानसभेचे बजेट पास होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या आमदारांना आमदार निधी देण्याची घोषणा करते. देशातील सर्व राज्यात राज्यातील गंगाजळी आणि विकासकार्य पाहाता मुख्यमंत्री सर्व आमदारांना निधी निश्चित करते. बहुतांशी राज्यात प्रत्येक आमदाराचा निधी २ कोटी हून अधिक असतो. ज्याचा वापर वेगवेगळ्या विकास कामांसाठी केला जातो.

संपूर्ण देशाची काय स्थिती ?

संपूर्ण देशाचा विचार करता पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार गुजरात सरकार त्यांच्या आमदारांना दीड कोटीचा आमदार निधी मंजूर करते. तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात हा आमदार निधी प्रत्येक दोन कोटी रुपये आहे. तर ओडीशा, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील आमदारांना तीन कोटी आमदार निधी मिळतो. तर महाराष्ट्र, केरल, झारखंड, तेलंगाना, राजस्थान, उत्तराखंड या राज्यातील आमदारांना प्रत्येकी ५ कोटी आमदार निधी मिळतो. तर दिल्लीत १५ कोटी आमदार निधी दिला जातो. ही रक्कम सर्व राज्याच्या तुलनेत तीन पट जास्त आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...