Eknath Shinde: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडणार की सत्ता सोडणार?, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काय आहेत 5 पर्याय

सध्या एकनाथ शिंदेंसोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याची चर्चा आहे, तर मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावलेल्या बैठकीला केवळ १६ आमदार उपस्थित होते, अशी माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष फुटण्याच्या स्थितीत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे काय पर्याय आहेत, त्यावर एक नजर टाकूयात.

Eknath Shinde: उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडणार की सत्ता सोडणार?, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काय आहेत 5 पर्याय
Uddhav Thackeray Eknath ShindeImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:26 PM

मुंबई– राज्यसभा निवडणुकीतील पराभव, विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव, मोठ्या संख्येने झालेली महाविकास आघाडीत झालेली फाटाफूट, आणि त्यापाठोपाठ झालेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाची सरकार (MVA Government)अडचणीत आले आहे. त्यातही मुख्य समस्या ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यापुढे उभी राहिली आहे. राज्यातील महाविकास आघाडीत आणि शिवसेनेच्या आमदारांत एवढी नाराजी का निर्माण झाली, हा प्रश्न अपस्थित झाला असून, त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या एकनाथ शिंदेंसोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याची चर्चा आहे, तर मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावलेल्या बैठकीला केवळ १६ आमदार उपस्थित होते, अशी माहिती आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष फुटण्याच्या स्थितीत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे काय पर्याय आहेत, त्यावर एक नजर टाकूयात.

१. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे देणे

बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे जर ३० पेक्षा जास्त आमदार असतील, तर शिवसेना पक्ष फुटण्याच्या स्थितीत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने पक्षात अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा जेव्हा सुरु होती, तेव्हाही एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते, मात्र हे ना त्यावेळी मागे पडले आणि उद्धव ठाकरेंचे नाव ऐनवेळी पुढे झाले. आता तर शिवसेना वाचवायची असेल तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे देणे, आणि किंगमेकरच्या भूमिकेत राहणे. हा पहिला पर्याय उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, मात्र यातून त्यांचे नेतृत्व कमकुवत सिद्ध होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांनी विधीमंडळ गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याने आता हा पर्याय स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

२. सत्ता सोडून राज्यपालांकडे राजीनामा सोपवणे

अशा स्थितीत जेव्हा मविआ सरकारमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात असताना, स्वता शिवसेना पक्षाचे आमदार नाराज असताना, सत्तेत राहण्यापेक्षा स्वाभिमानी नेत्याप्रमाणे सत्ता सोडणे, आणि पुढील राजकीय घडामोडीतून काही काळातून अंग काढून घेणे, सत्तेसाठी होणाऱ्या आगामी राजकीय गणिताकडे वेट अंड वॉच पाहत राहणे, हाही एक पर्याय आहे. यातून शिवसेना, उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी कधीही उत्सुक नव्हते असा मेसेज समाजात जाण्याची शक्यता आहे. हा पर्याय अद्यापही खुला आहे.

हे सुद्धा वाचा

३. एकनाथ शिंदेंशी उपमुख्यमंत्रीपदावरुन तडजोड करुन हा वाद तात्पुरता मिटवणे

सूरतमध्ये आमदारांसह असलेल्या शिवसेना आमदारांसोबत एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याशी पक्षातील काही वरिष्ठ नेते संपर्कात असल्याची चर्चा आहे. यात एकनाथ शिंदे यांच्याशी तडजोड करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदही शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर सरकार कितपत टिकेल याबाबत शंका उपस्थित करण्यात येते आहे.

४. या सरकारमधून बाहेर पडून भाजपासोबत घरोबा करणे

हाही एक पर्याय शिवसेनेपुढे आणि उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेला सोडून उद्धव यांनी वेगळा मार्ग चोखाळल्याने एकनाथ शिंदे आणि इतर आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करुन या महाविकास आघाडीतून बाहेर पडून, भाजपासोबत पुन्हा घरोबा करणे आणि पुढील सरकार सुरळीत चालवणे. २०२४ साली पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणे हाही एक पर्याय त्यांच्यासमोर आहे.

५. वेगळी शिवसेना स्थापन न होऊ देण्याचा प्रयत्न करणे

एकनाथ शिंदे हे जर मोठ्या आमदारांच्या संख्येने फुटले तर ते, त्यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करु शकतात. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना कमी आमदार संख्येसोबत शिवसेना टिकवण्याचे आव्हान असेल. अशा स्थितीत परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. शिवसेनेच्या नावानेच दोन पक्ष राज्यात निर्माण होऊ शकतात. ही स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रयत्न करावे लागतील.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.