AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेब आम्ही तुमच्यासोबतच… कुणी आईबाबांची तर कुणी साईबाबांची शपथ घेतली, तर कुणी… मातोश्रीत काय घडलं? राऊत थेट बोलले

ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा संजय राऊत यांनी फेटाळल्या आहेत. मातोश्रीवरील बैठकीत सर्व नऊ खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. आई-वडिलांची, साईबाबांची शपथ घेऊन आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

साहेब आम्ही तुमच्यासोबतच... कुणी आईबाबांची तर कुणी साईबाबांची शपथ घेतली, तर कुणी... मातोश्रीत काय घडलं? राऊत थेट बोलले
खासदार फुटणार असल्याच्या चर्चांवर काय म्हणाले संजय राऊत ?
| Updated on: Jun 16, 2026 | 2:01 PM
Share

ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 5 खासदार हे संसदेत वेगळा गट निर्माण करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच अस्वस्थता पसरली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे काल तातडीने दिल्लीला गेले होते. त्यातच ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत होते. मात्र, या सर्व अफवा असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. नऊही खासदार आमच्यासोबत आहेत. कोणी कुठेच जाणार नाही. या खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत आणाभाका घेतल्याचा दावाही राऊत यांनी केला. इतकेच नव्हे तर मातोश्रीत घडलेल्या बैठकीतील घडामोडींची माहितीही राऊत यांनी मीडियाला दिली आहे.

खासदारांच्या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटात अस्वस्थता होती. मातोश्रीत घडामोडींना वेग आला होता. मातोश्रीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडींना वेग आला होता. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार फुटणार असल्याच्या सर्व अफवा असल्याचं जाहीर केलं. मातोश्रीच्या बैठकीत काही खासदार ऑनलाईन होते. चार दिवसांपूर्वी झालेल्या या मिटिंगला सर्व खासदार होते. सर्वांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

सर्वांशी संवाद

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर या खासदारांनी साहेब आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. शेवटपर्यंत तुमच्यासोबतच राहू. हिंदुत्वाचं पालन करू, असं या खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, अशी माहिती राऊत यांनी दिली.

मातोश्रीत ऑनलाईन शपथ

तसेच या खासदारांनी आईवडिलांची शपथ घेतली. कुणी मुलांची शपथ घेतली. कुणी आई भवानीची शपथ घेतली. कुणी तुळजा भवानीची शपथ घेतली तर कुणी साईबाबांची शपथ घेऊन आम्ही तुमच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. लोकं ऑनलाईन पूजा करतात. तशी या खासदारांनी ऑनलाईन शपथ घेतली, असं राऊत म्हणाले.

वेगळा गट ही अफवाच

कुणीही वेगळा गट स्थापन करणार नाही. कुणीही कुठे जाणार नाही. नऊ खासदार आमच्यासोबतच आहे, असं सांगतानाच ज्यांना जायचं असेल तर जा, असं उद्धव ठाकरे कुणालाही म्हणाले नाहीत. मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मी पंतप्रधानांना भेटतो

कुणी कुणाला भेटलं म्हणजे पक्ष सोडणार असं होत नाही. माझं पंतप्रधानांकडे काम असेल तर मी त्यांना भेटायला जाईल. याचा अर्थ वेगळा होत नाही. काल संध्याकाळी मी मुंबईत होतो. नंतर दिल्लीत होतो. सुविधा आहे. शिवसेनेचे 9 खासदार आमच्या सोबतच आहेत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी