AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Elections 2026 : निवडणूक निकालापूर्वीच उद्धव ठाकरे अडचणीत? आरोपांमुळे खळबळ, मोठी बातमी समोर

मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा आरोप होत आहे, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेनंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

Maharashtra Elections 2026 : निवडणूक निकालापूर्वीच उद्धव ठाकरे अडचणीत? आरोपांमुळे खळबळ, मोठी बातमी समोर
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 15, 2026 | 4:50 PM
Share

आज महापालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे,  मात्र दुसरीकडे मतदान झाल्यानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतदान सुरू असतानाच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. मात्र त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांची देखील पत्रकार परिषद झाली, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार? 

Live

Municipal Election 2026

04:46 PM

मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून मतदान केंद्राच्या बाहेरच आंदोलन

04:19 PM

Maharashtra Mahapalika Election : मतदान केंद्रावरील फोटो शेअर केल्याने गुन्हा दाखल...

03:53 PM

पराभवाच्या मानसिकतेतून ठाकरे गटाची पत्रकार परिषद, राहुल शेवाळे यांचा आरोप

03:00 PM

शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

04:46 PM

Maharashtra Election Poll Percentage : जालना महानगरपालिका निवडणूकीसाठी आतापर्यंत 45.94% मतदान

04:41 PM

BMC Poll Percentage : मुंबईत 3.30 वाजेपर्यंत 41.08 % मतदान

मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेला परवानगी होती का? असा थेट सवालच आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.  त्यांनी निवडणूक आयोगावर बोट ठेवले. त्यांनी राजकीय भाष्य केलं का? उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान पहावं लागेल, असं शेलार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेला तेच, विधानसभेला तेच आणि आताही तेच,  दुपारी दीड वाजेपर्यंत तीस टक्के मतदान झाले. अशावेळी ही आडकाठी का? गतिरोधक का?  उद्धव ठाकरे प्रेस का घेतात यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवायला हवं, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

त्यांनी यंत्रणांकडे तक्रार केल्याचं अद्याप समोर आलेलं नाहीये,  उद्धव ठाकरे यांचा हा प्रचाराचा भाग आहे का? आमच्यावर टीका केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतलं जातं. त्यामुळे आज मी इथे बोलतो आहे. नाहीतर मला देखील पत्रकार परिषद घेण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे जे काही बोलले ते सर्व असत्य आहे,  हा त्यांच्या बुद्धितीतील हेराफेरीचा प्रकार आहे. ही चोरी नाही.  ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि ठाकरे बंधू रडके आहेत, असा घणाघात यावेळी आशीष शेलार यांनी केला आहे.

शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.
शाई पुसली जाण्यावरून मोठा वादंग, निवडणूक आयोगानं सांगितला सगळा इतिहास
शाई पुसली जाण्यावरून मोठा वादंग, निवडणूक आयोगानं सांगितला सगळा इतिहास.
फडणवीस VS ठाकरे बंधू, निकालाआधीच सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपली
फडणवीस VS ठाकरे बंधू, निकालाआधीच सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपली.
हरामाचा पैसा वाटला जातोय, असं भाजपचाच मंत्री म्हणतोय...- संजय राऊत
हरामाचा पैसा वाटला जातोय, असं भाजपचाच मंत्री म्हणतोय...- संजय राऊत.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं सहकुटुंब मतदान
ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं सहकुटुंब मतदान.
निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप
निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप.