
राज्यातील महापालिकांच्या निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांचे मतदान होणार आहे तर 16 तारखेला निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे सध्या कोणत्या महापालिकेत किती प्रभाग आहेत, 2017मध्ये कोण जिंकले होते याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूकीमध्ये प्रभाग क्रमांक 3ची लोकसंख्या किती? आरक्षण कोणाला किती, प्रभागाची व्याप्ती जाणून घ्या सर्वकाही…
लोकसंख्या आणि आरक्षण
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
उल्हासनगर प्रभाग तीनमध्ये एकूण लोकसंख्या 27312 आहे. त्यामध्ये अनुसुचित जाती 5778 तर अनुसुचित जमाती एकूण 337 आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ अ- अनुसूचित जाती (महिला), ३ ब-मागासवर्ग प्रवर्ग, ३ क-सर्वसाधारण (महिला) आणि ३ ड- सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक तीनमधील महत्त्वाचे भाग
उल्हासनगर प्रभाग तीनमध्ये हॉटेल स्वाती, ए १ बेकरी, साई पॅराडाईज, अजमेरा वन, भीम नगर, कोहिनूर प्राइम, महात्मा फुले चौक, कोणार्क रेसिडेन्सी, गुरुद्वारा श्री-सचखंड दरबार, संत रोहिदास नगर, खूनी खड्डा, मिनव्हां अपार्टमेंट, एसडी ओच्छानी हायस्कूल परिसर, मोती भजिया. आनंद मुथ्यू नगर, मिलनटॉवर, सम्राट अपार्टमेंट, बॅरेक नं. ४०५, ३९९, राजीव गांधी नगर आणि बालकिशन नगर, बेरेक नं. ३७, ३८, ३९, ३१, ३२, ममता ऑर्थोपेडिक सेंटर हे भाग महत्त्वाचे आहेत.
प्रभाग तीनमधील सीमा
उल्हासनगर उत्तर- ए ब्लॉक चौक [हजारे अपार्टमेंट-योगा चौक) (मुंबई-नाशिक रेल्वे लाईन) पासून शहाड स्टेशन चौकमार्गे गुलशन नगर वगळून मुरबाड रोडने जाकीर हुसेन शाळेपर्यंत ते नीलकंठ मंदिरापर्यंत. उल्हासनगर पूर्व- जाकीर हुसेन शाळा गुलशननगर, निळकंठ मंदिर, शिव रोडने भगत खुबचंद चौक, सिमेंट रोडने बरेक नं. ३७,३८,३९,३१,३२ सह, साई चरणदास चौकापर्यत. उल्हासनगर दक्षिण- साई चरनदास चौकापासून, एसईएस स्कूल, मंगलमूर्ती अपार्टमेंटमार्गे, मिलन टॉवर, सम्राट अपार्टमेंटसह, हजारी व्हिला समोरील जंक्शनपासून पंजवानी सदनमार्गे कोहिनूर गार्डन प्रोजेक्ट्स व मोरया ई-मोटर्सपर्यंत, ए ब्लॉक रोडने एसडीटी कालानी कॉलेज समोरील जंक्शनपर्यंत, राजीव गांधी नगर व बालकिशन नगर, सी ब्लॉक सेन्च्युरी मैदान चौकापर्यंत उल्हासनगर पश्चिम- सी ब्लॉक सेन्च्युरी मैदान चौकापासुन, मुंबई-नाशिक रेल्वे लाईन ते ए ब्लॉक चौक [हजारे अपार्टमेंट-योगा चौक] पर्यंत.
२०१७मधील विजयी उमेदवार
2017 मध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढाई दिसून आली होती. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा विजय झाला होता. तीन अ मधून भाजपाच्या आशा नाना बिराडे या तर तीन ब मधून भाजपाचे उमेदवार रविंद्र बागुल हे विजयी झाले होते. तीन क मधून शिवसेनेच्या उमदेवार चरणजित कौर भुल्लर आणि तीन ड मधून राजेंद्रसिंह भुल्लर यांचा विजय झाला होता.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE