AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशिदीत आढळली भुयारी रचना, मंचरमध्ये 200 पोलीस तैनात, आतापर्यंत नेमकं काय -काय घडलं?

पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशि‍दीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी एक रचना दिसून आली आहे.

मशिदीत आढळली भुयारी रचना, मंचरमध्ये 200 पोलीस तैनात, आतापर्यंत नेमकं काय -काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2025 | 7:34 PM
Share

मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुण्यातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशि‍दीचा काही भाग कोसळला, जीथे हा भाग कोसळला त्या भागात भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशि‍दीच्या झालेल्या नुकसानावर आक्षेप घेत, ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आता या भुयाराची पुरातत्व विभागाकडून पहाणी करण्यात येणार आहे, इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की, आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तातडीनं आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. घटनास्थळाची पहाणी करण्यात आली असून, काल रात्री देखील आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.  मंचर शहरातील सर्व धर्मीय  लोकांनी आमच्या आवाहानाला प्रतिसाद देत शहरात शांतता ठेवली आहे. एसआरपीफच्या दोन तुकड्या तिथे तैनात करण्यात आल्या आहेत.

आज आम्ही त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे, सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघालेला आहे, सर्वांनी शांतता राखण्याचं मान्य केलं आहे. आमचा 200 लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी सध्या आहे, अशी माहिती  रमेश चोपडे यांनी दिली आहे.

तर दर्गाच्या दुरुस्तीचे काम मंचर नगरपंचायतच्या वतीने सुरू आहे, दुरुस्तीचे काम करत असताना या वास्तूचा पुढील भाग कोसळला, तिथे एक भुयार आढळून आलं आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर वाद होऊ नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळी या ठिकाणी प्रशासनाने पाहणी केली आहे,  दोन्ही समाजातील नागरिकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे, अशी माहिती आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.