कडक कपडे घालतात अन्… नितीन गडकरी यांचा राजकीय नेत्यांना थेट टोला..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच मोठे विधान केले. नितीन गडकरी यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यांनी राजकीय नेते कसे असतात, यावर भाष्य केले. खास शैलीत त्यांनी टोला लगावला आहे.

कडक कपडे घालतात अन्... नितीन गडकरी यांचा राजकीय नेत्यांना थेट टोला..
Union Minister Nitin Gadkari
| Updated on: Oct 25, 2026 | 9:48 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच नागपूरमधील कार्यक्रमात मोठे भाष्य केले. नागपुरात दरवर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अ‍ॅग्रो व्हिजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात गडकरी यांनी आपल्या खास शैलीत राजकीय नेत्यांना टोला लगावला. आमच्याकडे राजकारणात हुशार नेते असतात. बोटाने मलम लावण्याचं काम करतात. कडक कपडे घालतात, कार्यक्रमाच्या मंचावर येऊन बसतात, इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतात. नेते गेले की पळून जातात. असे चतुर लोक खूप आहेत. त्यांची चतुराई लक्षात येते, पण त्यांच्यात ओनरशिप नसते. राजकारणात हे चालून जात असतं, अशा शब्दांत त्यांनी नेत्यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले.

महादेवाच्या मंदिरात दूध अर्पण करण्याच्या उदाहरणातून त्यांनी राजकारण्यांच्या मानसिकतेवरही भाष्य केले. पुढे त्यांनी म्हटले की, महादेवाच्या मंदिरात सर्वांनाच दूध टाकायला सांगितलं, पाऊस पडावा म्हणून. तर राजकारणातील लोक पाणी टाकतील, दुधाचा थेंबही दिसणार नाही. कारण साहेबांनी सांगितलं तर सारं गाव दूध टाकणारच आहे, मग आपलं दूध कशाला संपवा, असा विचार ते करतात.

Loading...

शेवटी काही फलनिष्पत्ती तर झाली पाहिजे. नुसतं सौम्य होऊन उपयोग नाही. आपण सर्वांनी ओनरशिप घेतली पाहिजे की आपल्या गावात, मतदारसंघात येऊन मी चित्र बदलविल,” असे आवाहन करत नेत्यांनी केवळ मिरवण्यापेक्षा आपल्या गावात आणि मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी ठोस काम उभारावे, असा संदेश गडकरी यांनी दिला.

नितीन गडकरी यांच्या या विधानाची चर्चा होत आहे. नितीन गडकरी यांनी राजकारणात कसे लोक आहेत, यावर भाष्य केले. त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आपल्या खास शैलीत ते राजकीय नेत्यांना टोला लगावताना दिसत आहेत. राजकीय लोकांचे काम कसे आहे हे सांगताना ते दिसले. राजकारणात किती हुशार नेते असतात, हे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us