AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बीड हादरलं, घरात घुसून महिलेवर बलात्कार, आरोपीचं वाल्मिक कराड कनेक्शन, धक्कादायक माहिती समोर

बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलानं महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! बीड हादरलं, घरात घुसून महिलेवर बलात्कार, आरोपीचं वाल्मिक कराड कनेक्शन, धक्कादायक माहिती समोर
Amar BangarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 24, 2026 | 2:58 PM
Share

बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलानं एका 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे.  अमर बांगर असं आरोपीचं नाव आहे, त्याच्याविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, परंतु अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने या 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अजूनही आरोपी अमर बांगर याला अटक करण्यात आलेली नाहीये. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अमर बांगर हा  पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर हे वाल्मिक कराडचे सहकारी आहेत.  किरण बांगर यांचा मुलगा अमर बांगर याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, त्याच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीची पार्श्वभूमी ही बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी जोडलेली असल्यामुळे या प्रकरणाची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आरोपी अजूनही मोकाट असून, त्याला अटक करण्यात आलेलं नाहीये.

दरम्यान वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे. सध्या तो तुरुंगात आहे, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटक असलेल्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी तुरुंगात देखील एका कैद्याला मारहाण करत धमकावल्याची माहिती समोर आली होती, याची एक कथित ऑडिओ क्लिप देखील प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती.  या मुळे देखील मोठा गोंधळ उडाला होता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ