AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळ उडवून देणारी पोस्ट, गूढ वाढलं…

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे, मात्र दुसरीकडे त्याचा मुलगा सुशील कराड याची एक फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली असून, चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळ उडवून देणारी पोस्ट, गूढ वाढलं...
Sushil KaradImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 4:03 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाचा उद्रेक झाल्याचा पहायला मिळाला. आरोपींना पकडण्यासाठी सरकारवर मोठा दबाव निर्माण करण्यात आला, त्यावेळी अनेक आंदोलन देखील झाली. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड देखील सध्या जेलमध्येच आहे. मात्र दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या मुलाची सुशील कराडची एक सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सुशील कराड नेमकं काय बोलणार? काही मोठा खुलासा करणार का? असे अनेक प्रश्न या पोस्टमुळे उपस्थित करण्यात येत आहेत.

सुशील कराड हा वाल्मिक कराड याचा मुलगा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप असल्यामुळे सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. त्याच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ही पोस्ट चांगलीच व्हायरलं झाली आहे, ज्यामध्ये ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं त्याने म्हटलं आहे.  त्यामुळे आता सुशील कराड काही गौप्यस्फोट करणार आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातल्या परळीमधील महादेव मुंडे यांची देखील हत्या झाली आहे. या प्रकरणात देखील वाल्मिक कराड याच्यावरच आरोप होत आहेत.  काही दिवसांपूर्वी  महादेव मुंडे यांच्या मुलाला अभ्यासिकेमध्ये जात असताना मारहाण झाली होती. या प्रकरणात संशयाची सुई सुशील कराड याच्याकडे आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने सुशील कराडवर आरोप करत संरक्षणाची मागणी केली होती, त्यानंतर आता सुशील कराडची ही पोस्ट व्हायलर झाली आहे.

दरम्यान  महादेव मुंडे हत्या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट आहे,  या प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली होती. नार्को टेस्टचा रिपोर्ट आता एसआयटीला मिळाला आहे. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या नार्को  टेस्टमधून नेमकी काय माहिती मिळणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...