पुण्यात यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा, नाटकाच्या प्रयोगादरम्यान घोषणाबाजी
पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. संगीत सन्न्यस्त खड्ग या नाटकाच्या प्रयागादरम्यान कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. संगीत सन्न्यस्त खड्ग या नाटकाच्या प्रयागादरम्यान कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली. हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. या नाटकातून भगवान गौतम बुद्ध यांचा अपमान केल्याचा आरोप वंचिने केला आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या केला.
या नाटकात हिंसेचे समर्थन करण्यात आले
या बाबत बोलताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, ‘सावरकर लिखित हे नाटक आहे. या नाटकाचा दुसरा प्रयोग होत आहे. सावसकरांच लिखाण नेहमी फुले शाहू आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या विरोधात राहिलेलं आहे. आम्ही ने नाटक पहायला आलो होतो, नाटक पूर्ण पाहिले. यात सावरकरांना जगासाठी बुद्ध कामाचा नसून युद्ध कामाचे आहे असा संदेश दिला आहे. या नाटकात हिंसेचे समर्थन करण्यात आले आहे.’
गौतम बुद्धांच्या शिकवणीला विरोध
याबाबत बोलताना एका महिला कार्यकर्त्याने सांगितले की, नाटकामधून सावरकरांनी सांगितले की शांततेने नव्हे तर भांडणातून मार्ग निघू शकतो. गौतम बुद्धांची शिकवण आहे की, शांततेत सर्व प्रश्न सुटू शकतात, याला विरोध करण्यात आला आहे.
नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारली
आणखी एका कार्यकर्त्यांने सांगितले की, ‘या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांचे पूर्णपणे हनन करण्यात आले आहे. या देशात बुद्धांच तत्वज्ञान कामाचं नाही, इथे फक्त भांडणे करुन प्रश्न सुटू शकतो असं यात दाखवण्यात आले आहे. या नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारण्यात आली आहे.’ दरम्यास सध्या घटनास्थाळावर पोलिस पोहोचले असून परिस्थिती नियंत्रित केली जात आहे.
