AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाताची मेहंदीही सुकली नाही… संसाराचं स्वप्न भंगलं… भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू, लहान बाळाची प्रकृती चिंताजनक

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्दजवळ महामार्गावर टायर फुटल्याने भीषण कार अपघात झाला. लग्नाहून परतणाऱ्या क्रूझर गाडीला टँकरवर धडक बसली, यात नववधूसह ३ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले असून एका लहान मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वऱ्हाड घेऊन निघालेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हाताची मेहंदीही सुकली नाही... संसाराचं स्वप्न भंगलं... भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू, लहान बाळाची प्रकृती चिंताजनक
भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू
| Updated on: Apr 29, 2026 | 11:35 AM
Share

जळगावमधून एक अतिशय भीषण आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने झालेल्या या कारअपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे या मृतांमध्ये, नुकतच लग्न झालेल्या एका नववधूचाही समावेश असल्याच माहिती समोर आली आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

हाताची मेहंदीही सुकली नाही, अपघातात नववधूने गमावला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात च्या वापी येथून लग्नाचं वऱ्हाड घेऊन अकोला येथे ही क्रूझर कार जात होती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर असतानाच या धावत्या क्रूझर कारचं टायर अचानक फुटलं आणि ही कार त्या रोडलगत उभ्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. अतिशय भीषण अशी ही धडक होती. लग्न झाल्यानंतर नववधूला परत घेऊन येताना जळगाव मधील वराड गावाजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जिचं नुकतंच लग्न झालं अशा नववधूचाही मृतांमध्ये समावेश असून त्यामुळे सगळेच हळहळले. नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे असून तिघेही एकच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात आणखी 6 जण जखमी असून लहान मुलाची प्रकृती गंभीर आहे.

पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

दुसरीकडे बुलढाण्यात एक दुर्दैवी घटनाघडली आहे. बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथील चेतन सोळंकी या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा बस स्थानकात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गिरडा गावात शोककळा पसरली आहे. चेतन हा पोलिस भरतीची तयारी करत होता, छत्रपती संभाजीनगर येथे त्याने तसा प्रयत्न ही केला असून मैदानी चाचणीत तो खरा उतरला असून लेखी परीक्षा बाकी होती. काल संध्याकाळी सायंकाळी चेतन हा बुलढाणा वरुण धाड ते मढ या एस टी बसमध्ये जाण्यासाठी चढत होता, मात्र गर्दी असल्याने तोल जाऊन तो बसच्या चाकाखाली आली. त्याला गंभीर अवस्थेत त्याला खाजगी रुग्णालयात भरती केले असता प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला . या घटनेमुळे चेतनच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे . अतिशय गरीब घरातील चेतन विद्यार्थी असल्याने होतकरू होता अशी माहिती ग्रामस्थानी दिली. शासनाने त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा ग्रामस्थानी केली आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान.
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.