AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai News : अचानक श्वास कोंडला, घशात खवखव… एकाचा गुदमरून मृत्यू होताच वसईत नागरिकांची पळापळ

Vasai News : अचानक श्वास कोंडला, घशात खवखव… एकाचा गुदमरून मृत्यू होताच वसईत नागरिकांची पळापळ

| Updated on: Nov 26, 2025 | 9:34 AM
Share

वसईत क्लोरिन सिलेंडरमधून वायू गळती होऊन एक भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १९ जण बाधित झाले आहेत, ज्यात अग्निशमन दलाचे जवानही आहेत. घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात मृत व्यक्ती कोसळताना आणि नागरिक धावपळ करताना दिसत आहेत. बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वसईत एक भयानक घटना घडली आहे. तेथे क्लोरिन सिलेंडरमधून वायुगळती होऊन एकाचा मृत्यू झाला तर 19 जण त्यामुळे बाधित झाले. या घटनेचे लाईव्ह सीसीडीव्ही फुटजेही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिम दिवनमान परिसरात क्लोरीन सिलेंडर लीक झाल्याने परिसरात पसरलेल्या वायू गळती मुळे, श्वास घेण्यास त्रास झाला आणि एकाने जीव गमावला. तर 19 जण यात बाधित झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून तो धाडकन खाली पडल्याचे त्यात कैद झाले. तर तेथील इतर नागरिकांना श्वास घेण्यास कसा त्रास होत होता आणि नागरिकांची कशी धावपळ उडाली हेही cctv मध्ये दिसत आहे.

या बाधितांमध्ये 5 जण वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आहेत. या सर्व बाधित नागरिकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल, मंगळवार दुपारी चार वाजता ही घटना घडली. देव परडीया (वय 59) असे मयत इसमाचे नाव असून ते वसई पश्चिमेच्या दिवानमान परिसरातील रश्मी प्लाझा या इमारतीमध्ये राहत होते.

सीसीटीव्ही फुटेज समोर

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेच्या दिवानमान परिसरात पाण्याची टाकी आहे, त्या टाकीच्या खाली हा क्लोरीनचा सिलेंडर होता. अचानक परिसरामध्ये हिरव्या रंगाचा वायू पसरला आणि लोकांना श्वास घेणं कठीण झालं, लोकांना उलट्या देखील होऊ लागल्या. लोकांनी ताबडतोब स्थलांतर केलं. या वायू गळती मध्ये बाधित झालेल्या मध्ये सर्वाधिक वयोवृद्ध नागरिक असून, अनेकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र तब्बल एक तासानंतर हा सिलेंडर आहे डिस्ट्रॉय करण्यात आला. वसईच्या सनसिटी परिसराला त्या सिलेंडरची विल्हेवाट लावण्यात आली. या वायूगळतीमुळे बाधित झालेल्या व्यक्ती रुग्णालयात दाखल असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यातील काहीजणांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं तर काहींना अद्याप त्रास होत असल्याचे समजते. त्यांच्यावर अद्याप उपचार सुरूच आहेत अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

मात्र या वायुगळतीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून एका व्यक्तीचा हकनाक जीव गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Published on: Nov 26, 2025 09:26 AM