7 जूनला साजरा केला वाढदिवस, अन् लगेचच… मुंब्रा दुर्घटनेतील जवानाची मन हेलावून टाकणारी कथा!

मुंब्रा ते दिवा लोकल ट्रेन स्टेशन दरम्यान मोठा अपघात झाला आहे. या रेल्वे अपघातामध्ये एका जवानाच देखील मृत्यू झाला आहे.

7 जूनला साजरा केला वाढदिवस, अन् लगेचच... मुंब्रा दुर्घटनेतील जवानाची मन हेलावून टाकणारी कथा!
Vicky Mukhidal
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 09, 2025 | 9:23 PM

मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात ठाणे रेल्वे पोलिसात कार्यरत असलेले पोलिस जवान विकी मुख्यदल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कल्याण परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच, ७ जून रोजी विकी यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, आणि येत्या १७ जून रोजी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण त्याआधीच काळाने हा कुटुंबाचा आधार हिरावून नेला.

आज सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी मुंबईकडे जात असताना मुंब्रा स्थानकात लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे विकी मुख्यदल (वय ३५) यांचा तोल गेला आणि ते गाडीतून खाली पडले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.विकी मुख्यदल हे कल्याण पूर्वेतील लोकग्राम संकुलातील सिंधू इमारतीत पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासोबत राहत होते. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेले मुख्यदल गेल्या चार वर्षांपासून या परिसरात स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा: काका, आय लव्ह यू, तुझ्याशिवाय…; पुतण्यासोबत शारिरीक संबंध, भावाला कळाल्यानंतर.. पोलिसही हादरले

शेजाऱ्यांनी व्यक्त केला शोक

विकी मुख्यदल यांचे शेजारी संतोष आगवणे यांनी शोक व्यक्त केला आहे. “७ जून रोजी विकीचा वाढदिवस होता. त्याने फोनच्या डीपीवर वाढदिवसाचा फोटो ठेवला होता. त्याच दिवशी आम्ही स्टेशन परिसरात भेटलो होतो. त्याच्या मुलाचा वाढदिवस १७ जूनला आहे, पण त्या आधीच काळाने त्याला हिरावलं” असे आगवणे म्हणाले.

विकी यांच्या शेजारी स्नेहा कावळे म्हणाल्या, “ही अतिशय दुःखद घटना आहे. सरकारने विकी यांच्या कुटुंबाला मदत करावी. आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाय करावेत.” विकी मुख्यदल यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळी अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचले आहेत.