Video : कृषीमंत्री दादा भुसेंनी धरली चाड्यावर मूठ, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली पेरणी!

कृषीमंत्री दादा भुसे यांनी चाड्यावर मूठ धरली, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावात पेरणी केली.

Video : कृषीमंत्री दादा भुसेंनी धरली चाड्यावर मूठ, तर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनीही केली पेरणी!
दादा भुसे, एकनाथ शिंदेंनी पेरणी केली


मुंबई : मान्सूनचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु होते. मालेगाव ताकुल्यात पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे परिसरातील शेतात तिफन चालताना दिसत आहे. मालेगाव तालुक्यातील चिंचवड गावातील शेतकरीही पेरणी करत होते. या परिसरातून जात असताना कृषीमंत्री दादा भुसे यांना एका शेतात पेरणी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आपल्या गाड्यांचा ताफा थांबवत दादा भुसे यांनी चाड्यावर मूठ धरली. राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रिमहोदयांनी आपल्या शेतात उतरुन पेरणी केल्याचं पाहून शेतकरीही सुखावल्यांच पाहायला मिळालं. (Dada Bhuse and Eknath Shinde did the sowing)

कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या चिंचवड गावात शेतात उतरुन औत हाती घेत पेरणीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. जमिनीत पुरेशी ओल असेल तरच पेरणी करण्याचं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली असल्याची ग्वाही यावेळी भुसे यांनी शेतकऱ्यांना दिली.

एकनाथ शिंदेंनी केली पेरणी

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या शेतात पेरणी करताना दिसत आहेत. सोबतच्या लोकांचं मार्गदर्शन घेत आपण पेरणी व्यवस्थित करत आहोत ना? असा प्रश्न विचारताना शिंदे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. शिंदे यांचा पेरणीचा हा अंदाज शिवसैनिकांची मनं जिंकत आहे.

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करु नये, अतिवृष्टीमुळे बियाणं वाया जाईल; कृषी विभागाचा सल्ला

मराठवाड्यातील ‘मिशन ऑक्सिजन’, उर्जामंत्र्यांकडून परभणीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी; अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश

Dada Bhuse and Eknath Shinde did the sowing

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI