Video: हातात ओढणी अन् मोबाईल, महिला डॉक्टरचा 30 सेकंदांचा हादरवणारा व्हिडीओ; हॉटेलच्या कॅमेऱ्यात सगळं कैद!

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरचा सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे. आता या फुटेजमध्ये नेमकं काय आहे पाहा...

Video: हातात ओढणी अन् मोबाईल, महिला डॉक्टरचा 30 सेकंदांचा हादरवणारा व्हिडीओ; हॉटेलच्या कॅमेऱ्यात सगळं कैद!
Satara doctor case
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 29, 2025 | 4:09 PM

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आता या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला डॉक्टरचा सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे.

घर मालकाने घरातून काढल्यानंतर ऐन वेळी कुठे जायचे म्हणून महिला डॉक्टरने मध्यरात्री मधूदीप हॉटेल बुक केले. हे हॉटेल तिने दोन दिवसांसाठी बूक केले आहे. दोन दिवस महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडली नाही म्हणून मालकाने खोलीचे दार तोडले. तेव्हा महिला डॉक्टर मृत अवस्थेत खोलीमध्ये आढळून आली. तिने मृत्यूपूर्वी हातावर सुसाइट नोट लिहिली होती. त्यामध्ये तिने गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले. आता महिला डॉक्टर हॉटेलमध्ये गेली तेव्हा नेमकं काय घडलं? हे समोर आले आहे.

वाचा: फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI निघाला चालाख! शरण येण्यापूर्वी केले मोठे काम, नेमकं काय केलं?

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?

मधूदीप हॉटेलचे मालक रणजितसिंह भोसले यांनी महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये चेकइन केल्यापासूनचा सीसीटीव्ही फूटेज सर्वांसमोर आणला आहे. या व्हिडीओमध्ये महिला डॉक्टर जीन्स आणि टॉप घालून हॉटेलच्या रिसेप्शनवर एण्ट्री करताना दिसत आहे. तिच्या एका हातात मोबाईल, खांद्यावर बॅग आणि दुसऱ्या हातात ओढणी असल्याचे दिसत आहे. रिसेप्शनवर चेकइन केल्यानंतर महिला डॉक्टर खोलीची चावी घेऊन हॉटेलच्या आत जाते. त्यानंतर ती हॉटेलची खोली चावीने खोलताना दिसत आहे.

पुरावे डिलीट?

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टरचे व्हाट्सअप चॅट डिलीट झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळालेले सर्व डिजिटल पुराव्याची सायबर टीममार्फत तपासणी सुरू केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याबरोबरच डॉक्टर महिलेची वैयक्तिक माहिती असणारी किंवा तक्रारी दिलेली अशी कोणतीही डायरी सापडलेली असल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहे.