Pune News : शनिवारवाड्यासमोर नमाज पढण्याचा कथित व्हिडीओ व्हायरल ? घटनेने मोठी खळबळ
पुण्यातील शनिवारवाड्याच्या मैदानात मुस्लीमांकडून नमाज पढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला आहे.

पुण्याच्या शनिवारवाड्यासमोरील उद्यानात मुस्लीम लोकांमार्फत नमाज पढण्याचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे शांत असलेल्या पुण्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार समाजमाध्यमांत व्हायरल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर या संदर्भात एक कथित व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आता निरनिरळ्या चर्चा होत आहेत. हा प्रकार नेमका कसा आणि कधी घडला याविषयी तर्क वितर्क केले जात असून या संदर्भात आता हिंदू संघटनांनी विरोध केल्याचे पुढे येत आहे.
पुण्याच्या प्रसिद्ध ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आतील बाजूला मुस्लीमांना धार्मिक कार्य करत नमाज पठण केल्याचा व्हिडीओ व्हायलर झाला आहे. या घटनेनंतर आता पतितपावन संघटनेच्या वतीने शनिवार वाड्यात शिव वंदना केली जाणार असल्याने शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. या पूर्वी सारस्वत बाग येथेही अशाच प्रकारे मुस्लीमांनी नमाज पढण्याच्या कार्यक्रम केला होता असा आरोप केला जात आहे.
मेधा कुलकर्णी यांनी घेतली भूमिका
शनिवार वाडा हा आमच्या विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी येऊन नमाज पठण केला आहे, त्या जागेचा शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत. असं काम करत असाल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. येथे आम्ही आता शिव वंदना करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत. येथे हिंदू धर्मच चालेल असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले असून त्या शनिवारवाडा येथे दाखल झाल्या आहेत.
गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आत मुस्लीमांकडून नमाज पढण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पतित पावर संघटना आणि इतर हिंदू संघटनांनी येथे रविवारी सायंकाळी जमून शिव वंदना घेतली. या वेळी भाजपाचा खासदार मेधा कुलकर्णी देखील हजर होत्या. यावेळी येथे गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र करण्यात आला. या वेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित हिंदू कार्यकर्त्यांचे या शुद्धीकरणाबद्दल अभिनंदन देखील केले.
