Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने शरद पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद.. विजय वडेट्टीवार यांनी थेट..

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यातच इंडिया आघाडीच्या बैठकीला पवारांचे खासदार जाणार नाहीत. कालच सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, आपण इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाहीत.

Delimitation Bill : डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने शरद पवारांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद.. विजय वडेट्टीवार यांनी थेट..
Delimitation Bill
| Updated on: Nov 28, 2026 | 10:35 AM

Delimitation Bill 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. कालच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या डिलिमिटेशन बिलाला आमचा पाठिंबा आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. त्यातच इंडिया आघाडीच्या बैठकीला एकही खासदार शरद पवारांच्या पक्षाचा जाणार नाही. एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने डिलिमिटेशनला जाहीर विरोध केला आहे. परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी तळ्यात मळ्यात दिसत होती. पण सुप्रिया सुळे यांच्यानंतर एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाही. इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे यावरून पुढे आले. विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. खंजीर खुपसण्याचे काम त्यांच्या पक्षाने कायमच केल्याचे त्यांनी म्हटले.

डिलिमिटेशन हुकूमशीसाठीच आहे, पवारांचा हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. पवारांचा पक्ष हा सत्तेसाठीच बनलाय हे सिद्ध झालं. त्यांच्याकडे असलेले 10 आमदार, त्याच्या भरोशावर मुख्यमंत्रिपद मांडणे आणि त्यातून काही मिळवण्याची अपेक्षा असेल तर ते हास्यास्पद आहे. भारतीय जनता पक्षाने त्याने शिवसेना शिंदेंकडे 60 आमदार असतानाही त्यांना मुख्यमंत्रिपद दिले नाही आणि त्यांनी या निवडणुकीत पूर्ण ताकद लावली.

Loading...

जर डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यामुळे जर यांना मुख्यमंत्री करत असतील तर आनंद आहे. म्हणजे ते भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतील, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक गोष्टींना पायंदळी तुटवण्याचे पाऊल उचलतील, तर त्यांना लखलाब आहे. कोणी म्हणतंय की, पक्ष फुटणार आहे म्हणून पाठिंबा दिला आहे. आता यात किती तथ्य आहे हे मला माहिती नाही.

त्यातच शरद पवार रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार यांचा पक्ष भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे. त्यातच इंडिया आघाडीच्या बैठकीला पवारांचे खासदार जाणार नाहीत. त्याबदल्यात मुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीतील पक्षाने थेट टीका पवारांचा पक्षावर केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us