डंपिंगचा वाद पेटला, भंडार्लीत डंपिंग ग्राऊंड उभारण्यास 14 गाव संघर्ष समितीचा विरोध; रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने

डंपिंगचा वाद पेटला, भंडार्लीत डंपिंग ग्राऊंड उभारण्यास 14 गाव संघर्ष समितीचा विरोध; रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने
villagers protest

भंडार्ली येथील डंपिंगचा वाद पेटला आहे. येथील 14 गाव संघर्ष समितीने भंडार्लीत डम्पिंग ग्राऊंड उभारण्यास विरोध केला आहे. आज गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या डंपिंगला विरोध करत ठाणे महापालिकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

अमजद खान

| Edited By: भीमराव गवळी

Jan 17, 2022 | 5:41 PM

कल्याण: भंडार्ली येथील डंपिंगचा वाद पेटला आहे. येथील 14 गाव संघर्ष समितीने भंडार्लीत डम्पिंग ग्राऊंड उभारण्यास विरोध केला आहे. आज गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या डंपिंगला विरोध करत ठाणे महापालिकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

ठाणे महापालिकेने भंडार्ली गावात चार हेक्टर जागा घेऊन त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील कचरा ग्रामस्थांच्या माथी का? असा संतप्त सवाल उपस्थित करत 14 गाव संघर्ष समितीने या डंपिंगला तीव्र विरोध केला आहे. ठाणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनास माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अन्य नेत्यांनी या आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला आहे.

जन आक्रोश आंदोलन

भंडार्ली गावात ठाणे महापालिकेचा डंपिंग ग्राऊंडच्या प्रकल्पाला ग्रामस्थांसह 14 गाव संघर्ष समितीने विरोध दर्शवित सरकारकडे धाव घेतली होती. सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. ग्रामस्थांचा विरोध न जुमानता ठाणे महापलिका डंपिंग ग्राऊंडचा प्रकल्प गावात राबवित असल्याच्या निषेधार्थ आज जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. या आंदोलनात पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील, मनसेचे प्रकाश भोईर, संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर येंदालकर, जीवन वालीलकर, गुरुनाथ पाटील, विजय पाटील, चित्रा बाविस्कर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

नेत्यांकडे फक्त पैसे खायचे व्हिजन

ठाणे महापालिकेकडे विकासाचे व्हिजनच नाही. 25 वर्षापूर्वी या शहराचा विकास व्हायला सुरुवात झाली. तेव्हा अनेक जागा त्या ठिकाणी मोकळ्या जागा होत्या. तेव्हाच त्यांनी डंपिंग ग्राऊंडसाठी नियोजन करायला हवे होते. ठाण्याच्या नेत्यांनी फक्त आणि फक्त पैसा खायचा आणि कमावायचे हेच व्हिजन ठेवले आहे, अशी टीका माजी खासदार संजीव नाईक यांनी केली आहे.

दर महिन्याला 22 लाख भाडे द्यावे लागणार

भंडार्ली गावातील ग्रामस्थांसह 14 गाव संघर्ष समितीचा या डंपिंग ग्राऊंडला विरोध आहे. माझाही विरोध आहे. नागरिकांचा विरोध असताना प्रकल्प राबविल्यास त्यावर होणारा खर्च वाया जाऊ शकतो. दर महिन्याला 22 लाख रुपये या जागेचा भाडे महापालिकेस द्यावे लागणार आहे. त्याऐवजी हा प्रकल्प अन्य ठिकाणी राबवावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे महापालिकेतील नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केली. ठाण्यातील नेत्यांना दूरदृष्टी नाही. अन्यथा हा प्रकल्प ग्रामस्थांच्या माथी मारला नसता, असं पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड म्हणाले. ग्रामस्थ वालीलकर यांनी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं ग्रामस्थ वालीलकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: ठाण्यात आघाडीत बिघाडी, महापौर म्हस्के म्हणतात, मी आघाडीच्या बाजूने नाही; तर आव्हाड म्हणाले…

Dombivali Crime : वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, कारण अस्पष्ट, घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ

VIDEO: बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने अक्कल येत नाही, आनंद परांजपेंचा पलटवार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें