मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून चव्हाण दिल्लीत; मेटेंचा आरोप

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. (vinayak mete criticized ashok chavan over Maratha reservation)

मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून चव्हाण दिल्लीत; मेटेंचा आरोप
vinayak-mete ashok chavan
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 11:34 AM

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. (vinayak mete criticized ashok chavan over Maratha reservation)

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. तेव्हापासून विनायक मेटे सातत्याने चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत. काल चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर मेटे यांनी आज पुन्हा एकदा चव्हाणांवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या नावाखाली चव्हाण हे दिल्लीत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव हे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे ते लॉबिंग करत असल्याचा दावा मेटे यांनी केला.

चव्हाणांनी काल दिल्लीत मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची बैठक घेतली असं सांगून मराठा समाजाची व राज्याची फसवणूक केली आहे. या बैठकीला अभिषेक मनु सिंघवी वगळता कोणताच वकील उपस्थि नव्हता, असं सांगतानाच चव्हाणांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना का बोलावले नाही? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, कालही मेटे यांनी चव्हाणांवर टीका केली होती. मराठा आरक्षणावर येत्या 25 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश दिले होते. परंतु, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेशही पाळले नाहीत. पण चव्हाण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन बैठकीला गेले आहेत, असा आरोप मेटे यांनी केला होता. चव्हाण मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला होता. (vinayak mete criticized ashok chavan over Maratha reservation)

संबंधित बातम्या:

अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांचेही आदेश पाळत नाहीत; विनायक मेटेंचा आरोप

… तर 50 टक्क्यांमध्ये समावून घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

(vinayak mete criticized ashok chavan over Maratha reservation)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.