AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : वंदेभारत एक्सप्रेसचा निसर्गरम्य प्रवास, पांढरेशुभ्र धबधबे, हिरव्या डोंगररांगाचे दर्शन, रेल्वेने केला व्हिडीओ व्हायरल

रेल्वेने सह्याद्री घाटांचे दर्शन घडविण्यासाठी कोकण मार्गानंतर पुणे मार्गावर मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन या गाड्यांना पारदर्शक छतांचे विस्टोडोम कोच बसविले होते. आता वंदेभारतमुळे या डब्यांची गरजच नाही.

Viral Video : वंदेभारत एक्सप्रेसचा निसर्गरम्य प्रवास, पांढरेशुभ्र धबधबे, हिरव्या डोंगररांगाचे दर्शन, रेल्वेने केला व्हिडीओ व्हायरल
csmt-solapur vandebharat Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 16, 2023 | 9:49 PM
Share

मुंबई | 16 जुलै 2023 : वंदेभारत एक्सप्रेस ( VandeBharat Express ) आता पर्यटनासाठी खास आकर्षण ठरली आहे. या ट्रेनने धार्मिक पर्यटनाबरोबर पावसाळी पर्यटनही घडत आहे. देशभरात आतापर्यंत 25 वंदेभारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. या वंदेभारत ट्रेनचे तिकीटदर जादा असले तरी त्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यापूर्वी रेल्वेने निसर्गदर्शनासाठी मेल-एक्सप्रेसना पारदर्शक छताचे विस्टाडोम कोच ( Vistadom Coach ) बसवले होते. आता वंदेभारतमुळे अशा स्वतंत्र पारदर्शक छतांच्या डब्ब्याची गरजच नाही अशी स्थिती बनली आहे.

मुंबई सीएसएमटी ते सोलापूर मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरु करण्यात आलेली देशातील नववी वंदेभारत ही बोरघाटातून जात असल्याने सह्याद्रीच्या घाटांचे पावसाळी पर्यटन घडत आहे. प्रवाशांना डोंगर रांगावरुन कोसळणारे धबधब्यांचे नयनरम्य मनोहारी दर्शन त्यामुळे घडत आहे. रेल्वे मंत्रालयाने तर धबधब्या जवळून जाणाऱ्या वंदेभारतचा व्हिडीओच ट्वीटरवर शेअर केला आहे.

हाच तो रेल्वे मंत्रालयाचा व्हिडीओ पाहा…

सीएसएमटी – सोलापूर वंदेभारतची डब्यांची स्थिती

मुंबई ते सोलापूर वंदेभारतला 16 डब्बे असून तिला दोन प्रकारच्या श्रेणींचे डबे बसविण्यात आले आहेत. एसी चेअरकार आणि एक्झुकेटिव्ह चेअर कार अशा त्या श्रेणी आहेत. ही ट्रेन मध्य रेल्वेमार्फत चालविली आणि मेन्टेनन्स केली जात आहे. बुधवार वगळून आठवड्याच्या सर्व दिवसात ही ट्रेन चालविली जाते.

वंदेभारत सेमी हायस्पीड ट्रेन व्हाया पुणे चालविली जात असून 4.55 किमीचे अंतर 06.35 तासांत ती कापते. या ट्रेनमुळे पारंपारिक ट्रेनपेक्षा दीड तासांची बचत होते. सीएसएमटीहून ती दु.4.05 वा. निघते आणि मुक्कामाला रात्री 10.40 वा. पोहचते. परतीच्या प्रवासात सोलापूरहून स. 06.05 वा. सुटते आणि सीएसएमटीला दु. 12.35 वा. पोहचते.

धार्मिक पर्यटनाकरीता उत्तम –

मुंबई ते सोलापूर एक्सप्रेसने सीएसएमटी ते सोलापूर या दोन शहरांची कनेक्टीव्हीटी वाढली आहे. सोलापूर मधील सिद्धेश्वर, अक्कोलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पु्ण्याजवळील आळंदी अशा धार्मिक स्थळांना या ट्रेनमुळे प्रवाशांना जाता येणार आहे. या ट्रेनाला 115 टक्के भारमान मिळाले असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

सीएसएमटी ते सोलापूर वंदेभारतचे थांबे –

सीएसएमटी ते सोलापूर प्रवासात चार स्थानकांवरच थांबते. दादर, कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन आणि कुर्डुवाडी असे मोजकेच थांबे तिला देण्यात आले आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी