AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील नगरपरिषदा- नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांची मतदान प्रक्रिया संपन्न,उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११ हजार ८२१ पुरुष आणि १० हजार ८५३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर पोटनिवडणुकांमध्ये ३ हजार ३२४ पुरुष आणि ३ हजार ४१९ महिला मतदारांनी मतदान केले.

राज्यातील नगरपरिषदा- नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांची मतदान प्रक्रिया संपन्न,उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी
Election
| Updated on: Jun 20, 2026 | 10:17 PM
Share

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी शनिवारी २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

आज स. ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ८१.४९ टक्के, नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ६६.५२ टक्के, बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायत -नगरपरिषदेकरिता ७६.३३ टक्के आणि अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपंचायत-नगरपरिषदेकरिता ७३.३३ टक्के तर अकोट नगरपंचायत- नगरपरिषदेकरिता ६७.३१ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी ७२.१२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तसेच, आज झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातील पाली नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ८५.३० टक्के, नाशिक जिल्ह्यातील पेठ नगरपरिषद- नगरपंचायतीकरिता ८४ टक्के, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद -नगरपंचायतीकरिता ६४.५४ टक्के, वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ७७.५७ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपरिषद -नगरपंचायतीकरिता ७६.३१ टक्के मतदान झाले.

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ७५.०१ टक्के, कुरखेडा नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ८०.३७ टक्के आणि अहेरी नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ६१.५० टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपरिषद – नगरपंचायतीमध्ये ७४.८५ टक्के मतदानाची नोंद झाली. या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये सरासरी ७१.५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

८ जागा बिनविरोध निवडून आल्या

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांपैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच, तीर्थपुरी नगरपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नसल्याने उर्वरित ३८ जागांसाठी सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यासाठी राज्यभरातील ५१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या, २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल