Walmik Karad Phone Records : वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार
Walmik Karad Latest News : वाल्मिक कराड याने आवादा कंपनीला केलेल्या धमकीच्या फोनचे तपशील आता समोर आलेले आहे. यात कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचं उघड झालं आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कराडने आवादा कंपनीला केलेल्या धमकीच्या फोनचे रेकॉर्ड आता समोर आलेले आहेत. सीआयडीने सादर केलेल्या चार्जशीटमध्ये धमकीच्या सविस्तर संवादाचा तपशील नमूद करण्यात आलेला आहे. यात कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिलेली होती. आहे त्या परिस्थितीत काम बंद करा. अशी धमकी वाल्मिक कराडने दिलेली होती. त्याचबरोबर कराडने या अधिकाऱ्याला केलेली शिवीगाळ देखील यात आहे. बीडच्या न्यायालयात सीआयडीने हे आरोपपत्र सादर केलं आहे. यातून या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे आता या आरोप पत्रातून आणखी काय काय खुलासे होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
