AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात! कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संवेदनशीलतेने जिंकली मनं

Maharashtra Drought Farmers: संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आहेत. ते दुष्काळग्रस्त गावांचा पाहणी दौरा करणार आहेत. त्याचवेळी कृषी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेने मनं जिंकली आहेत.

संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात! कृषी खात्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संवेदनशीलतेने जिंकली मनं
महाराष्ट्र दुष्काळ
| Updated on: Sep 22, 2026 | 2:38 PM
Share

या वर्षात पावसाने डोळे वटारले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशाला मोठा फटका बसला आहे. राज्यातील बळीराजा नैसर्गिक संकटात अडकला आहे. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. कास्तकारांना आर्थिक आणि सामाजिक आधाराची गरज लक्षात घेत कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्य कृषी सेवा महासंघाच्या नेतृत्वात कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा संकल्प सोडला आहे. या कर्मचार्‍यांनी एक मोठा आदर्श घालून दिला आहे.

कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात

एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ध्यातील कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी, कर्मचारीही एक दिवसाची वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या नेतृत्वात कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी कर्मचारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

शेतकर्‍यांना संकटाच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार आहेत. राज्यातील कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी-कर्मचार्‍यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी दिली आहे.

कृषी विभागाचा कौतुकास्पद निर्णय

वर्धा जिल्ह्यातील कृषी विभागातील सर्व तांत्रिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन बळीराजासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2026 च्या वेतनातील एक दिवसाचा पगार कपात होऊन तो जमा होईल. वर्धा जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दुष्काळात हिवरे बाजारचा आदर्श

राज्यात अनेक ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हिवरे बाजारने पुन्हा एकदा पाणी नियोजनाचा आदर्श घालून दिला. 1995 पासून गावात दरवर्षी पाण्याचा ताळेबंद आखला जातो. 2 ऑक्टोबर, 1 मे आणि नवरात्रीच्या सातव्या माळेला गावाचा पाण्याचा ताळेबंद सादर केला जातो. उपलब्ध पाण्यानुसार शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, तूर यासारखी कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली असून ऊस, कांद्यासारखी जास्त पाणी लागणारी पिकं टाळली आहेत. गावात बोअरवेलला बंदी असल्याने भूजल पातळीही टिकून असून विहिरी आणि हातपंपांना मुबलक पाणी उपलब्ध आहे. पाण्याचा ताळेबंद आखल्यास राज्यातील इतर गावांनाही पाणीटंचाईवर मात करता येईल, असा विश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...