Wardha Corona | वर्ध्यात 62 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव, तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह

| Updated on: May 11, 2022 | 12:58 PM

गेली दोन महिने कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. परंतु, तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. घाबरण्यासारखं काही नाही, असं प्रशासनानं सांगितलंय.

Wardha Corona | वर्ध्यात 62 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव, तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह
वर्ध्यात 62 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव
Image Credit source: t v 9
Follow us on

वर्धा : जिल्ह्यात आठ मार्चनंतर म्हणजेच 62 दिवसांनंतर कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. तिघांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. सेवाग्राम रुग्णालयातील डॉक्टर (Sevagram Hospital) परिवार आहे. नुकतेच ग्वालियर येथून लग्नासमारंभ आटोपून वर्धेत आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा यु टर्न घेतल्याने आरोग्य विभागाने (Health Department) काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सेवाग्राम येथील डॉक्टर त्यांची पत्नी आणि 18 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली. ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. सेवाग्राम येथील डॉक्टर दाम्पत्य हे आपल्या मुलीसोबत नुकतेच मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथून आले होते. कोरोनाचे लक्षण दिसताच चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिघांपैकी दोघांनी कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहेत. तर एकाने बूस्टर डोजही घेतला आहे. सध्या तीनही रुग्ण हे गृहविलगीकरणात (Home Separation) असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत.

तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं

वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 58 हजार 113 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 57 हजार 147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे 1 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, गेली दोन महिने कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. परंतु, तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत. घाबरण्यासारखं काही नाही, असं प्रशासनानं सांगितलंय.

काही रुग्ण सापडताहेत पण, लक्षणं सौम्य

कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आला आहे, असंही टोपे यांनी सांगितलंय.

हे सुद्धा वाचा