AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | सोनं स्वस्तात मिळते म्हणून घेऊ नका, अन्यथा फसवणूक झालीच म्हणून समजा, वर्ध्यात नेमकं काय घडलं?

कमी किमतीत सोनं मिळतं म्हणून एका आटोचालकानं ते खरेदी केलं. पण, ते सोनं बनावट निघालं. बनावट सोनं देऊन ऑटोचालकाची फसवणूक करण्यात आली. दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. दाभा येथील रेल्वे रुळाजवळ ही घटना घडली.

Wardha Crime | सोनं स्वस्तात मिळते म्हणून घेऊ नका, अन्यथा फसवणूक झालीच म्हणून समजा, वर्ध्यात नेमकं काय घडलं?
हिंगणघाट पोलीस ठाण्याअंतर्गत बनावट सोने विक्रीची घटना घडली.
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 9:32 AM
Share

वर्धा : बनावट सोनं देऊन 20 हजारांची रक्कम घेत ऑटोचालकाची फसवणूक (Auto Driver Fraud) करण्यात आली. ही घटना दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी (Hinganghat Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा (Mhasala in Wardha District) येथील संत ज्ञानेश्वर नगरात प्रशांत मनोहर उमाटे राहतो. हा ऑटोचालक आहे. त्याच्या ऑटोत दोन्ही आरोपी प्रवास करीत होते. दरम्यान दोघांनी आमच्याकडे सोनं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, असे म्हणत मोबाईल क्रमांक घेतला. त्यानुसार प्रशांत यांच्या मोबाइलवर धनराजचा फोन आला आणि सोनं पाहिजे असल्यास दाभा परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ या असे म्हणाला.

काय आहे प्रकरण

प्रशांत उमाटे हे तेथे गेले असता आरोपी धनराज भोसले आणि चारू फिरोज पठाण हे दोघे त्यांना भेटले. त्यांनी प्रशांतला खरं सोनं आहे, असे भासवून 20 हजारांची रक्कम घेऊन बनावट सोनं देत फसवणूक केली. ही बाब प्रशांत उमाटे याच्या लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. त्याने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासचक्र फिरवून दोन्ही आरोपींना हिंगणघाट येथील रेल्वे फाटक परिसरातून अटक केली.

सोनं खरेदी करताना सावध राहा

काही लोकं एखादी वस्तू स्वस्तात मिळते म्हणून लोभात पडतात. या लोभापायी त्यांचं नुकसान होतं. अशीच ही घटना वर्ध्यात घडली. वीस हजारांत सोनं मिळालं म्हणून ऑटोचालकानं ते खरेदी केलं. नंतर पाहतो तर काय ते सोनचं बनावट निघालं. शेवटी त्याला पोलिसांत धाव घ्यावी लागली. आरोपी पकडले गेले. पण, त्याला झालेला मनस्ताप कसा परत मिळणार. म्हणून एखादी वस्तू स्वस्तात मिळते म्हणून लोभात पडू नका. अन्यथा तुमचं नुकसान झालंच म्हणून समजा.

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

वीज कर्मचाऱ्यांचं पुण्यात आंदोलन, मेस्माविरोधात एकजूट; संप नको चर्चेतून तोडगा काढू : नितीन राऊत

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.