5

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

दीपा यांची हत्या केल्यानंतर शनिवारी त्यांचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन एक निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता. रविवारी परिसरातील लोकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली.

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक
नागपुरात महिला कंडक्टरची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 8:28 AM

नागपूर : नागपूरमधील महिला कंडक्टरच्या (Lady Conductor) हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. दाम्पत्याने महिलेची हत्या (Murder) केल्याचं तपासात समोर आलं आहे. नागपूरमधील (Nagpur Crime) कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील उप्पलवाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. प्लास्टिक बॅगमध्ये भरुन मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून पती-पत्नीने मिळून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. कर्जाने दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तगादा लावल्याने दाम्पत्याने तिचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 41 वर्षीय महिलेची हत्या झाली होती. दीपा जुगल दास असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या शनिवारपासून बेपत्ता होत्या. दीपा दास या एका शाळेच्या स्कूल बसवर वाहक म्हणून काम करत होत्या.

मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरुन फेकला

दीपा यांची हत्या केल्यानंतर शनिवारी त्यांचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन एक निर्जन स्थळी फेकून देण्यात आला होता. रविवारी परिसरातील लोकांना मृतदेह दिसल्यानंतर याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली.

दाम्पत्याला अटक

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी कसून तपास केला असता सनी हिरालाल सोनी आणि सोनम सनी सोनी या पती-पत्नीने दीपा यांची हत्या करुन मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरुन फेकला असल्याचं स्पष्ट झालं.

कर्ज वसुलीच्या वादातून हत्या

दीपा दास या बचत गट चालवत होत्या. त्यांनी सोनी दाम्पत्याला कर्ज स्वरुपात काही रक्कम दिली होती. ती रक्कम वसूल करण्यासाठी दास मागे लागल्या होत्या. यामुळे दोघांनी मिळून दास यांची हत्या केल्याचा आरोप आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या

लाडीगोडी लावून शेतात नेलं, डोळ्यात मिरची पूड फेकून काटा काढला, वर्ध्यात शेतकऱ्याची निर्घृण हत्या

नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल