Wardha Crime: उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लंपास, सेवाग्राम रुग्णालयातील प्रकार, सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल

एमआरआय करुन बाहेर आल्यानंतर सुलोचना यांनी बॅगेत पाहिले असता बॅगेतील दागिने आणि पैसे गायब झाल्याचे पाहिले. दागिने आणि रोख रक्कम असा एकूणण 31 हजार रुपयांचा ऐवज बॅगेतून चोरी झाला. सुलोचना यांनी तात्काळ सेवाग्राम पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.

Wardha Crime: उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लंपास, सेवाग्राम रुग्णालयातील प्रकार, सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल
उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लंपास
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 3:25 PM

वर्धा : डोक्याच्या आजारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी एमआरआय कक्षात गेलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम अज्ञात महिलेने चोरुन नेल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली. सुलोचना श्याम नंदाने असे लुटण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अमरावतीहून उपचारासाठी सेवाग्राममध्ये आली होती महिला

सुलोचना नंदाने या अमरावतीतील रहिवासी आहेत. त्यांना डोक्याचा आजार झाला आहे. यासाठी सुलोचना या उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना एमआरआय करण्यास सांगितले होते. त्यानुसार सुलोचना या एमआरआय करण्यासाठी गेल्या होत्या. एमआरआयसाठी जाताना सुलोचना आणि अंगावरील सोन्याचे दागिने बॅगेत काढून ठेवले. तसेच बॅगेत उपचारासाठी आणलेली 4 हजार रुपयांची कॅशही होती. सुलोचना यांनी पैसे आणि दागिन्यांची बॅग त्यांचा भाऊ संजय मांढरे यांच्याकडे दिली आणि त्या एमआरआय कक्षात गेल्या.

सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटी महिला कैद

एमआरआय करुन बाहेर आल्यानंतर सुलोचना यांनी बॅगेत पाहिले असता बॅगेतील दागिने आणि पैसे गायब झाल्याचे पाहिले. दागिने आणि रोख रक्कम असा एकूणण 31 हजार रुपयांचा ऐवज बॅगेतून चोरी झाला. सुलोचना यांनी तात्काळ सेवाग्राम पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासला असता एक महिला बॅगेतून दागिने, पैसे काढताना दिसली. महिलेने तोंडावर रुमाल बांधला होता. तिच्यासोबत एक लहान मुलगीही होती. या महिलेने मोठ्या शिताफीने लहान मुलीच्या मदतीने सुलोचना यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम काढली आणि दोघींनी पळ काढला. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. (Jewelry stolen from a woman who went to Sevagram Hospital for treatment)

इतर बातम्या

Bike Theft | बायकोच्या हौसेसाठी महागड्या बाईक्सची चोरी, कल्याणचा चोरटा जेरबंद

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ