आम्हाला तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या; पूजा चव्हाणच्या वडिलांची विनंती

आम्हाला तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या; पूजा चव्हाणच्या वडिलांची विनंती
आमची कोणाविरोधातही तक्रार नाही. मला पाच मुली आहेत. आम्हाला जगू द्या, असे त्यांनी म्हटले आहे.

आता याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार, असा कयास बांधला जात आहे. | Pooja chavan father

Rohit Dhamnaskar

|

Feb 21, 2021 | 11:38 AM

बीड: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणा आता बासनात गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. कारण पूजा चव्हाण (Pooja Chavan suicide) हिचे वडील लहू चव्हाण यांनी सपशेल माघार घेतली आहे. आम्हाला कोणाविरुद्धही तक्रार करायची नाही. आम्हाला जगू द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. ( Pooja Chavan father new statement says we don’t want to file complaint)

पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर राजकीय पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडूनही पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी तृप्ती देसाई यांना विनंती केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काल पूजाच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी मी तक्रार देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. एक मुलगी गेली मात्र मला पाच मुली आहेत आम्हाला जगू द्या आम्ही यातून आता सावरलो आहेत. मला कोणाबद्दलही तक्रार द्यायची नाही असं लहूदास चव्हाण यांनी तृप्ती देसाईंना सांगितले.

त्यामुळे आता याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार, असा कयास बांधला जात आहे. मात्र, यामुळे चव्हाण कुटुंबावर कोणाचा दबाव आहे का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तक्रारच नसल्याने पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास करण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वनमंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण या तिघांवर संशय व्यक्त केला गेला आहे. मात्र, अद्यापर्यंत या तिघांपैकी एकानेही पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा दुवा असल्याचं मानलं जात आहे. विलासला ताब्यात घेतल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं. पण विलासही गायब असल्याने हा विलास कोण आहे? तो कुठे आहे? याबाबतचं गूढ वाढलं आहे.

विलास चौकशीत महत्त्वाचा दुवा ठरणार?

पूजा चव्हाण प्रकरणात विलास चव्हाण हा महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचं बोललं जातं. विलास हा पूजाच्या रुममध्ये राहत होता. शिवाय पूजाने आत्महत्या केली. त्या दिवशी तो तिथेच होता. रुग्णालयातही तो होता. तसेच कथित मंत्र्याच्या संपर्कातही होता. त्यामुळे पोलीस चौकशीत त्याची साक्ष महत्त्वाची ठरू शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

कोण आहे विलास?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास चव्हाण हा वन विभागातील सामाजिक वनीकरण विभागात नोकरीला होता. जानेवारीपासून तो या विभागात शिपाई म्हणून कार्यरत होता. पूजा चव्हाणच्या आत्महत्येपूर्वी म्हणजे एक महिनाच तो या विभागात आला होता. कंत्राटदार कंपनीने त्याची या विभागात नेमणूक केली होती. विलाससह अरुणही याच विभागात कामाला होता. त्यामुळे दोघांची चांगली ओळख झाली होती. विलासही बीडचाच असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

( Pooja Chavan father new statement says we don’t want to file complaint)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें