AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panjabrao Dakh Monsoon Forecast : हे तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, चिंताच मिटणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे, परंतु तरी देखील अनेक भागांमध्ये अद्यापही पाऊस झालेलाच नाही, परंतु आता वातावरणात बदल झाला असून, पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

Panjabrao Dakh Monsoon Forecast : हे तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, चिंताच मिटणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 19, 2026 | 10:30 PM
Share

राज्यात मान्सूनच आगमन झालं आहे, परंतु मान्सूनने अजूनही तळकोकणच सोडलेलं नाहीये. मान्सूनची वाटचाल मंदावली आहे. राज्याचा अजूनही बरासचा भाग कोरडाच आहे. तिकडे पावसाचा एक थेंबरी अजून पडलेला नाहीये, मात्र दुसरीकडे उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. चांगला पाऊस कधी होणार? याची प्रतिक्षा सर्वच जण करत आहेत. त्यातच आता भारतीय हवामान विभागाचा सुद्धा नवा अंदाज समोर आला आहे (IMD) हवामान विभागाने आधी 22 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल आणि पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता, मात्र या अंदाजामध्ये आत थोडा बदला झाला आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार अजूनही पुढील चार ते पाच दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्रात 25 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

काय आहे डख यांचा नवा मान्सून अंदाज 

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या मान्सूनच्या नव्या अंदाजानुसार राज्यात 22 जून, 23 जून आणि 24 जून या तीन दिवसांच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये या काळात पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यता आला आहे.  शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, येत्या 22 जूनपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि हळुहळु 30 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असंही पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. पावसाला पूर्व विदर्भातून सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान यंदाच्या पवासावर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे देशासह राज्यात यावर्षी कमी पाऊस पडेल, मान्सून सरासरीच्या 90 टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. यंदा पाऊस लांबल्यानं पेरण्यांचा खोळंबा झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. आता लवकरच राज्यात पावसाची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी