मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, मुंबईत ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.