AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather update : राज्यात जोरदार पाऊस बरसणार; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

पावसाबाबत दिलासा देणारी बातमी आहे, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख ( Weather expert Punjabrao Dakh) यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

Weather update : राज्यात जोरदार पाऊस बरसणार; नदी-नाले एक होणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
Punjabrao Dakh rainfall forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 4:59 PM
Share

राज्यात पावसाने दडी मारली आहे, ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. बळीराजाचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यात गणेशोत्सव काळात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे. 9 सप्टेंबरपासून ते 22 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. परतीचा पाऊस राज्यात चांगला बरसणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

 काय आहे पंजाबराव डख यांचा नवा अंदाज? 

9 सप्टेंबर रोजी राज्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडेल, काही भागात पाऊस होणार आहे, तर काही भागात पाऊस होणार नाही. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. ज्यामध्ये वर्धा, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या शक्यता आहे. बारा सप्टेंबर नंतर मात्र राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. 13 सप्टेंबर रोजी मात्र राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. 14 सप्टेंबरला महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे, मान्सून पुन्हा एकदा संपूर्ण राज्य व्यापून टाकणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. दरम्यान त्यानंतर 17 ते 22 सप्टेंबर या काळात पावसाचा वेग चांगला असेल, मात्र सर्वदूर असा पाऊस होणार नाही. राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस होईल, 14 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, मात्र एकाचवेळी सर्वदूर असा पाऊस होणार नाही, तो वेगवेगळ्या भागात पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

राज्यात पवासाची दडी 

दरम्यान राज्यात सध्या संपूर्ण ऑगस्ट महिना पाऊस झालेला नाहीये, राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र आता परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगला होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात