Weather Update : आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, 11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत होतं. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

Weather Update : आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, 11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा
Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 6:16 PM

देशासह राज्यात पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली होती. अनेक भागांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून( IMD) तब्बल 11 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 55 किमी एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने आपल्या अंदाजामध्ये म्हटलं आहे. हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातही पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही ठिकाणी पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह कोकणात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पुण्यासह आणखी काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पवसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यावर सध्या पावसाचं संकट तर आहेच, मात्र त्याचसोबत आता वादळाचं मोठं संकट निर्माण झालं आहे.

राज्यात पावसाची हजेरी

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. धाराशिवच्या कळंब परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी पिकाच्या कडब्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Follow Us