AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात लग्नाची धावपळ, नियतीला मात्र काही दुसरंच मान्य, नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू

लग्न म्हटलं की, घरात आनंदाचं आणि धावपळीचं वातावरण असतं. अशात काही अघटीत झालं की मोठा धक्का बसतो... लग्नाला काही दिवस शिल्लक असताना , नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू झाला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

घरात लग्नाची धावपळ, नियतीला मात्र काही दुसरंच मान्य, नवरदेवाचाच हृदयद्रावक मृत्यू
| Updated on: May 24, 2026 | 11:14 AM
Share

सुखाचं वातवरण कधी दुःखात बदलेल काहीही सांगता येत नाही. दहा दिवसांनंतर घरात लग्न होतं. पण लग्नाला फक्त 10 दिवस राहिलेले असताना नवरदेवाचं निधन झालं आहे. घरात लग्नाची धावपळ सुरु असताना, जळगाव मधील दहिगाव येथील 27 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 4 जून रोजी बोहल्यावर चढणाऱ्या या तरुणाचा, ऐन लग्नाच्या तयारीत असताना रोटावेटरच्या अपघातात झालेला मृत्यू अतिशय वेदनादायक आहे. लग्नाआधीच तरुणाला मृत्यूने कवटाळलं असल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दहिगाव येथील योगेश यशवंत पाटील, शोभराज रमेश महाजन यांच्या मोहराळे शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करण्यासाठी केला होता. रोटावेटर करीत असताना त्याचा अचानक तोल जाऊन तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून अडकून जागीच ठार झाला. तरी देखील ट्रॅक्टर सुरुच होता. संपूर्ण घटना एका तरुणाने पाहिली आणि त्याने तात्काळ ट्रॅक्टर बंद केला.

तरुणाने तत्काळ योगेश याच्या वडिलांना संपर्क केला त्याचे वडील व नातेवाईक त्वरित तिथे दाखल झाले. त्यानंतर योगेश याला कुटुंबियांनी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केलं. अखेर योगेश याची अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश यांचं लग्नाच्या 10 दिवस आधी निधन

योगेश याचं लग्न अवघ्या 10 दिवसांवर होतं. पण सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या योगेश याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरातून योगेश याच्या लग्नाची वरात निघणार होती आज त्याच घरातून योगेश याची अंत्ययात्रा निघाली. घरात सर्वत्र लग्नाची तयारी सुरु होती. पण कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही आणि नशिबापुढे कुणाचं काहीही चालत नाही. हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. फार कमी वयात योगेश याने अखेरचा श्वास घेतल्याने परिसरात दुःखाचं वातावरण आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ