विद्यानंद बापटांना थेट अमेरिकेला पाठवू, पुणेकर चांगलेच संतापले; डीजे बंदीवरून लोकांची भूमिका काय?
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी डिजेच्या ध्वनीप्रदुषणासंदर्भात आवाज उठवल्यानंतर राजकीय मंडळी संतप्त झाली आहेत. आता या प्रकरणात दोन गट पडले आहेत.

पुण्यातील गणेशोत्सव सध्या गाजत आहे. गणेशोत्सवात डीजे आणि लाऊड स्पिकरच्या विरोधात पुण्याच्या नारायण पेठेत राहणाऱ्या विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. या प्रकरणात पुणेकर जनतेने मोर्चा काढून डीजेविरोधात आंदोलन केले होते. आता डिजेच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही प्रतिक्रीया येत आहेत. आता पुण्यातील गणेशोत्सवात डीजे वाजलाच पाहिजे बापट यांनी पुणेकरांना गणेश उत्सव कसा साजरा करायचा हे शिकवु नये, त्यांना एवढा त्रास होत असेल तर आपण सर्वजण वर्गणी काढून त्यांना अमेरिकेला पाठवू अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिली आहे.
गणेशोत्सवात डिजे वाजलाच पाहिजे….
पुण्यातील गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे मात्र सध्या डीजेवरुन गणेश उत्सव चर्चेचा विषय बनला आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला काही नागरिकाकडून समर्थन तर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे. गणेशोत्सवात डीजे वाजलाच पाहिजे बापट यांनी पुणेकरांना गणेश उत्सव कसा साजरा करायचा हे शिकवु नये त्यांना एवढा त्रास होत असेल तर आपण सर्वजण वर्गणी करून त्यांना अमेरिकेला पाठवू अशी प्रतिक्रिया तरुण व्यक्त करत आहेत.
