‘पश्चिम महाराष्ट्रातील नेते मला टार्गेट करतायत; राज्यातील सर्वोच्च नेत्याच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल’

गंगापूर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा या कटाचा भाग आहे. | bjp mla prashant bamb

'पश्चिम महाराष्ट्रातील नेते मला टार्गेट करतायत; राज्यातील सर्वोच्च नेत्याच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल'
गंगापूर साखर कारखाना हडप करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च नेत्याने दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोपही प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला.
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 1:09 PM

औरंगाबाद: पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांनी मला लक्ष्य करण्यासाठी गंगापूर साखर कारखान्याच्या घोटाळ्यात गोवले, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केला. मी सातत्याने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न मांडत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते मला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत, असा दावा त्यांनी केला. (Western Maharashtra leader targeting me in gangapur sugar mill scam says bjp mla prashant bamb)

ते शुक्रवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गंगापूर साखर कारखाना घोटाळाप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा या कटाचा भाग आहे. गंगापूर साखर कारखाना हडप करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आपल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यातील सर्वोच्च नेत्याने दबाव आणला असल्याचा धक्कादायक आरोपही प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला.

गंगापूर साखर कारखाना घोटाळा: सभासदांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

काही दिवसांपूर्वीच वैजापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सभासदांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील सहा सदस्यांनी वैजापूर जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जामीन नाकारल्यामुळे सभासदांवर अटकेची टांगती तलवार आहे. सभासदांचा जामीन नाकारल्यामुळे आमदार प्रशांत बंब यांचाही जामीन अधांतरी आहे. सभासदांना जामीन मिळत नसल्यामुळे प्रशांत बंब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

गंगापूर कारखान्यात पैशांचा अपहार?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

संबंधित बातम्या :

भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल, 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप

माफी मागा अन्यथा 23 कोटींचा दावा दाखल करु, प्रशांत बंब यांची चिखलीकरांना नोटीस

(Western Maharashtra leader targeting me in gangapur sugar mill scam says bjp mla prashant bamb)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.