Video: ज्या टिपू सुलतानवर भाजप-सेनेत राडा होतोय, त्याच्याबद्दल राष्ट्रपती कोविंद नेमकं काय म्हणाले होते? काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट

Video: ज्या टिपू सुलतानवर भाजप-सेनेत राडा होतोय, त्याच्याबद्दल राष्ट्रपती कोविंद नेमकं काय म्हणाले होते? काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

टिपू सुलतानाबाबत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. भाजप नेत्यांच्या प्रोबधनासाठी त्यांनी हा व्हिडिओ पाहवं असा टिमटा सावंत यांनी काढला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 27, 2022 | 5:24 PM

गेल्या चार दिवसांपासून राज्यातलं राजकारण टिपू सुलतान (Tipu Sultan) याच नावाभोवती फिरतंय. मालाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून भाजप आणि सेनेत (Bjp Vs Shivsena) जोरदार राडा सुरू आहे. काल तर भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं, यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकरत्यांची धरपकड केली. या आंदोलनात अतुल भातखळकरही होते, काँग्रेस नेते अस्लम शेख यांनीही यावरून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं, भाजपच्या नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नावं दिलं त्या नेत्यांचे फडणवीस राजीनामे घेणार का? असा थेट सवाल त्यांनी नावाला विरोध करणाऱ्या फडणवीसांना विचारला. मात्र ज्या टिपू सुलतानवरून हे सर्व राजकारण पेटलं आहे, त्या टिपू सुलतानाबाबत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. भाजप नेत्यांच्या प्रोबधनासाठी त्यांनी हा व्हिडिओ पाहवं असा टिमटा सावंत यांनी काढला आहे. तर राष्ट्रपतींच्या या व्हिडिओवरून संजय राऊतांनीही भाजपला घेरले आहे, तसेच राज्यात ठाकरे सरकार आहे, दंगल करून दाखवाच असे खुले आव्हान राऊतांनी भाजपला दिले आहे.

राष्ट्रपती टिपू सुलतानबाबत काय म्हणाले?

या व्हिडिओत टिपू सुलतानाचा उल्लेख करताना राष्ट्रवती रामनाथ कोविंद म्हणातात, टिपू सुलतानाचा इंग्रजांशी लढताना वीर मृत्यू झाला. ते म्हैसूरच्या विकासातही अग्रगण्य होते, असा उल्लेख देशाच्या राष्ट्रपतींनी टिपू सुलतानाचा केला आहे. म्हैसूर प्रांतात टिपू सुलतानाचा मोठा दबदबा होता. सचिन सावंत यांनी राष्ट्रपतींचा हाच व्हिडिओ ट्विट करत भाजपला चिमटे काढले आहे, सचिन सावंत यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, @BJP4Maharashtra च्या नेत्यांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीद टिपू सुलतान यांचा केलेला गौरवार्थ उल्लेख. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नाही जरी केला तरी राष्ट्रपतींचा तरी भाजपा नेते आदर करतील अशी अपेक्षा आहे. असा टोला त्यांनी लगवाला आहे.

मुंबईच्या महापौर काय म्हणाल्या?

मुंबईत जी गोष्ट घडली नाही ती बोलून मुंबईची सुरक्षा बिघडवण्याचे काम हे लोक करत आहेत, अशी टीका भाजपवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच मी जे सांगत आहे ते रेकॉर्ड आहे, पेपर सांगत आहेत, बिनविरोध दोन रस्त्यांना टीपू सुलतान हे नाव दिले तेव्हा त्यांना कोणतेही ऑब्जेक्शन नव्हते, आता ते खोटं बोलत आहेत ते रेटून बोलत आहेत. टिपू सुलतानला 2019 ला तुम्हाचा विरोध सुरू झाला का ? असा सवालही त्यांनी विचारला आहे. आता केवळ शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत म्हणून टीका केली जातेय, मुंख्यमंत्री टॉप 5 मध्ये आहेत म्हणून यांना मुळव्याध झालाय, असा घणाघात त्यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Tipu Sultan: नवाब मलिक म्हणाले, टिपू सुलतान स्वातंत्र्य सेनानी, महान व्यक्तिमत्त्व; प्रवीण दरेकर म्हणतात, मलिक मुस्लिम समाजाचे असल्याने हिंदुद्वेष्ट्ये

Tipu Sultan: दंगल करून दाखवाच, इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊत यांचं भाजपला आव्हान

Tipu Sultan: मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल; टिपू सुलतान वादावरून राऊतांनी भाजपला घेरलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें