पूजा चव्हाणबाबत नेमकं घडलं काय? आत्महत्या, हत्या की अपघाती मृत्यू?

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला आठ दिवस उलटून गेले आहेत. (What exactly happened to Pooja Chavan? Suicide, murder or accidental death?)

पूजा चव्हाणबाबत नेमकं घडलं काय? आत्महत्या, हत्या की अपघाती मृत्यू?
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 4:41 PM

मुंबई: पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला आठ दिवस उलटून गेले आहेत. तरी तिच्या मृत्यूबाबतच्या ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पूजाने आत्महत्या केली, तिची हत्या झाली की तिचा अपघाती मृत्यू झाला? याबाबतचं अद्यापही कोडं उलगडलेलं नाही. त्यातच रोजच पूजाच्या मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे येत असल्याने तिच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे. (What exactly happened to Pooja Chavan? Suicide, murder or accidental death?)

आठ दिवसांपूर्वी काय घडलं?

स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचंच दिसत होतं.मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण असल्याचं बोललं गेलं. या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे या कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने पूजाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? अशी चर्चा सुरू झाली.

पोस्टमार्टम अहवाल काय म्हणतो?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजाने आत्महत्या केल्याचं म्हटलेलं नाही.

ऑडिओ क्लिपने गूढ वाढले

पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत 11 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. ही व्यक्ती आघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याचं सांगितलं जात आहे. या क्लिपमध्ये पूजाच्या उपचाराबाबतचा उल्लेख आला आहे. तसेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं या कथित मंत्र्याला माहीत असल्याचं संभाषणावरून दिसतं. या निमित्ताने पूजा कोणती ट्रीटमेंट घेत होती. या ट्रीटमेंटमुळे तर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला नाही ना? असे सवाल निर्माण होत असून तिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली, असे प्रश्नही या कथित क्लिपमधीत कथित संभाषणावरून दिसून येत आहे.

मुंडेंचा दावा कुठून?

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल, असं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाची पोलिसांनी आकस्मिक नोंद केली आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास सुरू आहे. क्लिपबाबतही अजून काहीच माहितीपुढे आलेली नाही. त्यातच ज्या मंत्र्यावर आरोप केले जात आहेत, त्यांनीही अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मुंडे कशाच्या आधारावर हा दावा करत आहेत? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. (What exactly happened to Pooja Chavan? Suicide, murder or accidental death?)

संबंधित बातम्या:

चित्रा वाघ यांच्यानंतर अजून एका भाजप नेत्याला धमकीचा फोन!

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

(What exactly happened to Pooja Chavan? Suicide, murder or accidental death?)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.