बँक खातं भरलेलं असावं, नाती समृद्ध असावी म्हणाणाऱ्या पूजाने टोकाचं पाऊल का उचललं? बोलक्या इन्स्टाग्राम पोस्टनी चटका लावला!

Pooja Chavan Suicide | इन्स्टाग्रामवर पूजा चव्हाण खूप एक्टिव होती. जिच्या पोस्ट नेहमी इस्पायरिंग ( Pooja Chavan Instagram post ) असायच्या, त्या पूजाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल कसं उचललं?

बँक खातं भरलेलं असावं, नाती समृद्ध असावी म्हणाणाऱ्या पूजाने टोकाचं पाऊल का उचललं? बोलक्या इन्स्टाग्राम पोस्टनी चटका लावला!
पूजा चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:38 PM

परळी: पूजा चव्हाण आत्महत्या ( Pooja Chavan suicide ) प्रकरणामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यातच आता या प्रकरणात आता मंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod ) यांचं नाव येत आहे, भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh BJP ) यांनी थेट राठोडांच्या नावाचा उल्लेख केला आहे. एक ऑडिओ क्लिप ( Audio Clip ) व्हायरल होत आहे. ज्यात संजय राठोड असल्याचं त्या म्हणाल्यात, ज्यातून हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पूजा चव्हाण खूप एक्टिव होती. जी पूजा चव्हाण नेहमी आनंदी राहायची, जिच्या पोस्ट नेहमी इस्पायरिंग ( Pooja Chavan Instagram post ) असायच्या ती पूजा चव्हाण अचानक निराश कशी झाली? आणि तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल कसं उचललं? हे जाणून घ्यायचं असेल तर तिच्या गेल्या काही दिवसांतल्या इन्स्टाग्राम पोस्टवर नजर टाकणं गरजेचं आहे.  ( What in the Instagram post of Pooja Chavan who committed suicide )

फक्त जिद्द ठेवा- 23 डिसेंबरची इन्स्टाग्राम पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Self Queen ?? (@the_poojalahuchavan)

पूजा चव्हाणच्या बहुतांश पोस्टमध्ये ती आनंदीच दिसते. मात्र, आपण सुरुवात करुया, 23 डिसेंबरच्या तिच्या पोस्टपासून कारण, इथे ती आनंदी दिसते. आयुष्यात जिद्द ठेवण्याचं सल्ला ती देते. यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, जिद्द ठेवा, आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. मात्र, असं म्हणणारी पूजा चव्हाणच टोकाचं पाऊल उचलेल असं यावेळी कुणालाही वाटलं नसेल

2021 मध्ये सुखी आयुष्य जगायचंय – नववर्षाची पहिली पोस्ट

नववर्षात पूजा चव्हाण आनंदीच दिसते. तिला आयुष्याकडून खूपकाही अपेक्षा असल्याचं दिसतं. नववर्षाची पहिल्या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लिहते,

भरलेली बँक खाती, समृद्ध नाती आणि सुखी आयुष्य… सगळं 2021 मध्ये हवंय.. .चला सुरुवात करुया..!

म्हणजेच पूजाला आयुष्याकडून खूपकाही अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा 2021 मध्ये पूर्ण होतील अशी आशा तिला होती. मात्र, याच पोस्टनंतर तिच्या आयुष्यात निराशेची छाया डोकावता दिसते. आणि यानंतरच्या पोस्ट पूजा कशाप्रकारे तणावात आहे, हे पुढच्या पोस्टमधून कळतं. ( What in the Instagram post of Pooja Chavan who committed suicide )

दगडूशेठ हलवाई चरणी पूजा- 31 जानेवारीची पोस्ट

नववर्षाच्या सुरुवातीला अगदी खूश असणारी पूजा आता निराशेकडे झुकू लागली होती. त्याचाच अंदाज 31 जानेवारीच्या पोस्टमधून येतो. यात तिने पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात गेल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली तिने लिहलंय,

काश कभी तो कुछ वैसा हो, जो मैंने सोचा वैसा हो !!

यातून कळतं की तिच्या मनाप्रमाणे काही घडताना दिसत नाही. मास्क लावलेला फोटो तिने पोस्ट केला आहे.

निराशेत असलेली पहिली- 3 फेब्रुवारीची पोस्ट

दगडूशेठ हलवाई मंदिराला भेट दिल्यानंतर अवघ्या 3 दिवसात पुन्हा एक पोस्ट करते. त्यामध्ये ती तणावात असल्याचं साफ जाणवतंय. या पोस्टमध्ये तिने खिडकीबाहेर बघतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिच्या चेहऱ्यावर निराशेची छाया साफ दिसते. या पोस्टमध्ये ती लिहते,

मैं ढूँढ रही हूँ वो आँखें, जो मेरी आँखों को पढ़ सकें !!

तिच्या मनात काय चाललंय, याचा अंदाज या पोस्टमधून तुम्ही बांधू शकता. या पोस्टखाली अनेकांनी निराश होऊ नको, लढत राहा अशा स्वरुपाच्या कमेंट्स केल्या आहेत, मात्र कमेंटला तिने उत्तर दिलेलं दिसत नाही.

शांतता लिहून कायमची शांत झाली, शेवटची पोस्ट – 6 फेब्रुवारी

6 फेब्रुवारीला पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेवटची त्यात तिने मास्क लावलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्या डोळ्यावरुनच ती नाराज असल्याचं दिसते. या पोस्टखाली तिने #khamoshiyan #unforgettablemoments हे हॅशटॅग दिले आहे. खामोशीया लिहलेली तिची ही पोस्ट शेवटची पोस्ट ठरली.

आठवड्यापासूनच्या स्टेट्समध्येही निराशाच

गेल्या आठवड्यापासून पूजाच्या सगळ्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्येही ती निराश असल्याचंच दिसतंय. आधी तिने निराश असलेल्या फोटोवर कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना….हे गाणं स्टेट्सला ठेवलं आहे. तर त्यानंतर तिने देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही हे गाणं ठेवलंय…तर शेवटच्या स्टेटसमध्ये तिने दृश्यम सिनेमातील घुटता हे दम हे गाणं ठेवलं आहे. त्यावरुन ती निराशेच्या काळोखात पूर्णपणे बुडाल्याचं कळतं आहे.

जी मुलगी आयुष्याबद्दल इतकी आशादायी होती, जिला आयुष्य भरभरुन जगायचं होतं, जिला तिचं बँक अकाऊंट कायम भरलेलं हवं होतं, नाती समृद्ध हवी होती आणि सुखी आयुष्य हवं होतं, तिने आपला अंत भयाण शांततेत केला. पूजाचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर शेवटचे 3 पोस्ट सोडल्या, तर एकही पोस्ट अशी दिसत नाही, जिथं ती निराश दिसते. त्यामुळं असं काय घडलं की तिला हा निर्णय घ्यावा लागला? यामागे कोण दोषी आहे? हे समोर येणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या:

वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ

पुजा आणि कथित मंत्र्यांचा शेवटचा संवाद कोणता? मंच्युरियन, ज्यूस आणि बरंच काही, ऐका, वाचा !

( What in the Instagram post of Pooja Chavan who committed suicide )

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.