आदित्य ठाकरेचा शिवसेनेशी संबंध काय, प्रतापराव जाधव यांचा सवाल

उपाशी-तापाशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनं ग्रामीण भागात काम केलं.

आदित्य ठाकरेचा शिवसेनेशी संबंध काय, प्रतापराव जाधव यांचा सवाल
प्रतापराव जाधव
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 11:33 PM

बुलडाणा – शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, आदित्य ठाकरे याचा शिवसेनेशी कधीपासून आला. शिवसेनेत आदित्य ठाकरे याचं योगदान काय. आदित्य ठाकरे यांनी एखादी शिवसेनेची शाखा स्थापन केली आहे का. आंदोलन करत असताना एखादा गुन्हा किंवा पोलीस केस आदित्य ठाकरे विरोधात आहे का. माझ्यासारख्या व्यक्तीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ३६ वर्षे काम केलं. या महाराष्ट्रात आम्ही शिवसेना वाढविली. घराघरापर्यंत बाळासाहेबांचे विचार नेले. गावागावापर्यंत शाखा नेल्या. गाव तेथे शाखा असा उपक्रम राबविला. घर तेथे शिवसैनिक हा बाळासाहेबांचा नारा दिला.

उपाशी-तापाशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनं ग्रामीण भागात काम केलं.  आदित्यचं वय काय. आदित्यचं वय ३२-३३ वर्षे आणि आमचे शिवसेनेतील कर्तृत्व ३६-३७ वर्षे. आमच्यासोबत बोलताना त्यानी वयाचं भान ठेवलेलं नाही.

आदित्यला थोडी जरी वाटत असेल, तर शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आमदार झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांची घोषणा होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी. आपल्या कुटुंबातील आदित्यला पुढं आणलं. आदित्यला निवडून देण्यासाठी दोन जणांना विधान परिषदेचं आमदार करावं लागलं.

पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीतून निवडून आल्यानं त्यांचा राजीनामा द्यावा. मग, लोकांना सांगत फिरावं, असा सल्ला प्रतापराव जाधव यांनी दिला.

खोक्यांचा विषय असेल, तर त्याला कुठलाही आधार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० खोक्यांचे आरोप केले गेले. त्या माध्यमातून सचिन वाझे, अनिल देशमुख हे जेलमध्ये गेले. ते खोके सरकारच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत जात होते का, याचा तपास करण्याची गरज असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.