PRAKASH AMBEDKAR : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे नवे निवडणूक चिन्ह काय? निवडणूक आयोगाकडे पाठवली ही नावे

नवी दिल्लीत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही यादी सादर केली. एक ते दोन दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला नवी निवडणूक चिन्ह मिळेल.

PRAKASH AMBEDKAR : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचे नवे निवडणूक चिन्ह काय? निवडणूक आयोगाकडे पाठवली ही नावे
PRAKASH AMBEDKAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 22, 2024 | 5:48 PM

नवी दिल्ली | 22 मार्च 2024 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक आयोगाकडे नव्या चिन्हाची यादी सादर केली आहे. नवी दिल्लीत प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही यादी सादर केली. एक ते दोन दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला नवी निवडणूक चिन्ह मिळेल.

नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित केले होते. महाराष्ट्राच्या एकूण 48 जागांपैकी प्रकाश आंबेडकर यांनी किमान 6 जागांची मागणी केली होती. मात्र, जागावाटपमध्ये आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला केवळ चार जागा देण्यात येतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचित आघाडी कॉंग्रेसला सात जागांवर पाठिबा देईल असे पत्र पाठविले होते. तसेच, या सात जागा कोणत्या त्या कळविण्यात याव्यात असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे त्या सात जागा वगळता अन्य ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार देणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

वंचित आघाडीला आपले उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह मिळवावे लागणार आहे. त्यासाठी प्रकाश आबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे नवे निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोडरोलर ही निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. निवडणूक आयोग या चिन्हावर एक ते दोन दिवसात निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचा नेत्यानाही यापैकी कोणते चिन्ह मिळते याची उत्सुकता लागली आहे.