AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे बजेट कधी सादर होणार? अजित पवारांकडून थेट घोषणा, म्हणाले…

आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलचीही घोषणा केली.

महाराष्ट्राचे बजेट कधी सादर होणार? अजित पवारांकडून थेट घोषणा, म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 01, 2025 | 3:15 PM
Share

Ajit Pawar On Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गींना मोठं गिफ्ट दिलं. निर्मला सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच निर्मला सीतारमण यांनी अर्थमंत्री म्हणून आठव्यांदा अर्थसंकल्प माडंताना विविध क्षेत्रांसाठी भरभरून आर्थिक तरतुदी केली आहे. अर्थमंत्र्यांनी उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञानासह कृषी क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी केल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना झुकतं माप देण्यात आलं आहे. तसेच गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केली आहेत.

केद्रींय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलचीही घोषणा केली.

“लाडक्या बहि‍णींचाही विचार करणार”

“मी केंद्राचं बजेट अजून ऐकलेलं नाही. पण तुमच्या राज्याचे बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे. त्यावेळी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा विचार करुनच अर्थसंकल्प मांडणार आहे. माझ्या लाडक्या बहि‍णींचाही मी विचार करणार आहे. तरुण तरुणींचाही विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम”

“मी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम घेत आहे. जे पुणेकरांना मिळतंय ते बारामतीमध्ये मिळालं पाहिजे. बारामतीमध्ये आधुनिक मॉडर्न किचन निर्माण होत आहे. बारामतीकरांनो फलटण चे बाहेर येऊन बारामतीमध्ये व्यवसाय करत आहेत”, असेही अजित पवार म्हणाले.

नवीन कर रचना कशी?

उत्पन्न कर
0 ते 12 लाखांपर्यंत कर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत 15 टक्के
16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के
20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के

4 लाखांपर्यंत करमुक्त

गेल्यावर्षी 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. यंदा नवीन आयकर प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता 4 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर एक रुपयाही भरावा लागणार नाही. पण ही घोषणा केवळ नवीन आयकर प्रणालीनुसार कर जमा करणाऱ्या करदात्यांनाच मिळणार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.