शेतकरी मदतीवर जीआर कधी निघणार? मोठे संकेत देत देवेंद्र फडणवीसांनी ‘तो’ दिवसच सांगितला! म्हणाले…

Devendra Fadnavis On Drought-affected Farmers: शेतकरी मदतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठे संकेत दिले आहे. मदतीबाबत सरकार जीआर कधी काढणार याबाबत त्यांनी सांगितले आहे.

शेतकरी मदतीवर जीआर कधी निघणार? मोठे संकेत देत देवेंद्र फडणवीसांनी तो दिवसच सांगितला! म्हणाले...
| Updated on: Sep 23, 2026 | 5:31 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर सोलापुरच्या दौऱ्यावर होते. दुष्काळाच्या पाहणीसाठी ते तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. यावळी उत्तर सोलापुरमधील कारंजा गावातील अनेक शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्‍यांनी संवाद साधला आहे. त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. यानंतर शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच मदतीचा जीआर कधी निघणार याबाबतही मोठे संकेत दिले आहेत.

यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोयाबीनचं मोठं नुकसान झाले आहे. शेंगा पाहायला मिळत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पीक नष्ट झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत मदत केली पाहिजे. कायद्याप्रमाणे पंचनामे करावे लागत आहेत. भेदभाव न करता मदत करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकार अन्नधान्य शिक्षण, चारा, पिण्याच्या पाण्यासंदर्भात मदत करेल. जी मदत करता येईल ती आम्ही करु. पुढील २-३ दिवसांत प्राथमिक जीआर काढणार आहे. चारा छावण्यांसदर्भात त्यांचा पण निर्णय करु. १२० दिवस पुरेल इतका चारा आहे, अंतर्गत नियोजन केलं तर चारा पुरवता येईल. बँकांकडून जास्तीचे व्याज आकारणी केली आहे. त्यासंदर्भात दुरुस्ती केली जात आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मदतीवर आश्वासनानंतर आता बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी उजनी धरणातील पाणी साठ्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, उजनी धरणात बऱ्यापैकी पाणी आहे. पिण्यासाठी राखीव पाणी ठेवावं लागेल. उजनीच्या आधारावर आपल्याला पाणी स्टोरेज करावं लागेल. गाळासंदर्भात कंत्राट देण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपावरही भाष्य केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, जखम कपाळा पट्टी गुडघ्याला, असं झालं आहे. ते का हारतात याचे संशोधन करण्याऐवजी आयोगावर टीका करतात. कर्नाटक, केरळात कांग्रेस आली की आयोग चांगलं. मात्र महाराष्ट्र महायुती आली की वाईट हे बंद केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी ठाकरेंना सुनावलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us