AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुठे परतला पाऊस ?, कुठे दुष्काळाची चाहूल, वाचा ए- टू -झेड माहिती…

यंदा मान्सूनवर एल- निनोचा मोठा फटका बसला आहे. राज्यात अनेक भागात आज पाऊस परतला असला तरी अनेक भागात गेले महिनाभर दडी मारुन बसलेला पाऊस अद्याप परतलेला नाही.

राज्यात कुठे परतला पाऊस ?, कुठे दुष्काळाची चाहूल, वाचा ए- टू -झेड माहिती...
weather forecast today
| Updated on: Sep 23, 2026 | 9:55 PM
Share

यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम अखेर जाणवायला लागला आहे, आता राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी महिना होऊन गेला तर पावसाचा ठिपूस देखील पडलेला नाही. तरीही काही ठिकाणी पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे. पुणे,सांगली, गोंदिया, सोलापूर आणि वाशिम येथे आज पावसाच्या सरींनी बळीराजाला सुखावले आहे.

सायंकाळी मेघगर्जनेसह पुण्यात पावसाने दमदार हजेरी दाखवली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यात पाऊस परतला आहे. त्यामुळे उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात देखील पावसाने हजेरी दाखवली आहे. वारणा पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने वाळत चाललेल्या पिकांना नवे जीवदान मिळाले आहे. कुरळप, करंजवडे, लाडेगाव, वशी, ऐतवडे बुद्रुक, येलूर, कुंदलवाडी, तांदळवाडी आणि ऐतवडे खुर्द परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या 25 ते 30 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने माळरानावरील खरीप पिके सुकू लागली होती.

पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बुधवारी झालेल्या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.गोंदियात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी दाखवली आहे. त्यामुळे हलक्या धानाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र धान पिकाच्या नुकसानीची चिंता व्यक्त केली जात आहे.

वाशिमच्या मानोरा परिसरात बुधवारी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून तब्बल ४५ ते ५० दिवसांनी पाऊस आल्याने नागरिकांना उकाड्यापाऊस दिलासा मिळाला आहे. या पावसाचा कपाशी पिकाला काही प्रमाणात फायदा होणार असला तरी या भागातील सोयाबीनचे पीक आधीच वाळून गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मात्र उशिरा पावसाचा फायदा होणार नाही.

वाळलेलं पीक पेटवून दिले

नांदेड जिल्ह्यात पावणे दोन महिन्यापासून पावसाने उघडीप दिली. दाभडच्या शेतकऱ्याने आपले वाळलेलं पीक पेटवून दिले. सोयाबीन वाळून गेल्याने त्रस्त शेतकऱ्याने सोयाबीन पेटवून दिल्याची घटना घडली आहे. वैजनाथ संभाजी सूर्यवंशी या शेतकऱ्याने आपले सोयाबिन पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. तात्काळ दुष्काळ जाहीर करून एक्करी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी त्याने केली आहे.

 शेतकऱ्यांसमोर आता रब्बीचंही संकट

पाण्याअभावी डोळ्यादेखत उभं पीक करपल्याने शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील हातले मंडळ परिसरात मका पिकाला मोठा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने चाळीसगाव तालुक्यातील हातले मंडळ परिसरातील मका पिकाला मोठा फटका बसला आहे. विहिरींची पाणीपातळी घटल्याने रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने तातडीने मदत न केल्यास शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे दुःख शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे.

सरासरी 53 टक्के पावसाची तूट

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. जिल्ह्यात सरासरी 53 टक्के पावसाची तूट झाली आहे. पावसाअभावी कोरडवाहू शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तीन महिने उलटूनही अनेक भागात मक्याला कणसं आलेली नाहीत. कापूस, सोयाबीनसह खरीप पिकांवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी