Sanjay Pawar : कोण आहेत कोल्हापूरचे संजय पवार ज्यांच्या नावाची राज्यसभेचे शिवसेना उमेदवार म्हणून चर्चा सुरुय?

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळ ग्रामीण भागातील आहेत.

Sanjay Pawar : कोण आहेत कोल्हापूरचे संजय पवार ज्यांच्या नावाची राज्यसभेचे शिवसेना उमेदवार म्हणून चर्चा सुरुय?
उद्धव ठाकरे/संजय पवार
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

May 24, 2022 | 9:51 AM

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण सुरू असताना शिवसेनेने (Shivsena) आपला उमेदवार ठरवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची आधी चर्चा होती. मात्र संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याचे दिसत आहे. तर शिवसेनेने आपला उमेदवार ठरवला आहे. कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आले आहे. शिवसेनेने औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरूरचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह संजय पवार यांचे नाव सध्या चर्चिले जात आहे. कालपर्यंत संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू होती. दुपारी बारावाजेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा, असे सांगण्यात आले होते. मात्र संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील जवळपास 25 ते 30 वर्षे त्यांनी शिवसेनेत काम केले आहे. ते सध्या जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते मूळ ग्रामीण भागातील आहेत. यावेळी ग्रामीण भागातील उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. एकीकडे संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत. तर त्यांना शह देण्यासाठी सर्वांशी संवाद असलेला उमेदवार शिवसेनेला हवा आहे. त्यादृष्टीकोनातून सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे विरुद्ध संजय पवार असा सामना याठिकाणी पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंचा काय निर्णय?

संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला असे दिसते. अपक्ष निवडणूक लढवून महाविकास आघाडी आणि भाजपाची मते घेऊन राज्यसभेवर जाण्याचे त्यांचे गणित होते. छत्रपतींच्या घराण्यातील असल्यामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे राज्यसभेचा मार्ग सोपा होईल, असे संभाजीराजेंना वाटत होते. मात्र, शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट घातल्याने संभाजी राजेंच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. मात्र, असे असले तरी शिवसेनेचा हा निर्णय भाजपाच्याच पथ्यावर पडताना दिसत आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यास शेवटच्या क्षणी भाजपा संभाजीराजेंना पाठिंबा देईल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें