AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025: चांद्यापासून बांद्यापर्यंत.. कोण जिंकलं, कोण हरलं? फक्त एका क्लिकवर घ्या जाणून..

Watch LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025 : नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल हाती येत असून कोण जिंकलं, कोण हरलं.. याचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या..

LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025: चांद्यापासून बांद्यापर्यंत.. कोण जिंकलं, कोण हरलं? फक्त एका क्लिकवर घ्या जाणून..
Maharashtra Local Body Election Results 2025 Image Credit source: Tv9
| Updated on: Dec 21, 2025 | 12:09 PM
Share

Watch LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025: राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. राज्यात महायुतीने 210 चा आकडा ओलांडला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्येही भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याचं चित्र आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत.. कोण जिंकलं, कोण हरलं, याचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेऊयात..

जळगावमधील शेंदुर्णी नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह एकूण 18 जागांसाठी निवडणूक पार पडलीय. इथं भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गोविंदा अग्रवाल विजयी ठरले आहेत. शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 6 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. गोविंदा अग्रवाल यांनी 650 मतांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उज्वला काशीद यांचा पराभव केला आहे.

वाशिममधील मंगरुळपीर नगरसेवक पदासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या पत्नी लता चितलांगे विजयी ठरल्या आहेत. तर आमदार सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) सागर हिरे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. भाजपला एक जागा राखता आली नाही.

जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारबाई विजयी झाल्या आहेत. जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. जेजुरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 नगरसेवक विजयी झाले आहेत. जेजुरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक विजयी झाले. तर जेजुरी नगरपरिषदेत एक अपक्ष नगरसेवक विजयी ठरला आहे.

शिर्डीत नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार जयश्री थोरात आघाडीवर आहेत. तर महायुतीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. दोन अपक्ष उमेदवार विजयी आहेत. जळगावच्या चोपडा नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी आघाडीवर आहेत.

नांदगाव नगर परिषद निकाल- विजयी उमेदवार

प्रभाग 7 रूपाली पाटील, शिवसेना बाळू शेवरे, शिवसेना

प्रभाग 8 पृथ्वी पाटील, शिवसेना

प्रभाग 9 काका सोळासे, शिवसेना राणी जाधव, शिवसेना

धुळे पिंपळनेर नगरपरिषद

भाजपाच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे विजयी

सासवड नगरपरिषद

भाजपा- १३ विजयी शिवसेना -९ विजयी

भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदी जगताप विजयी

पिंपळनेर नगरपरिषद

पिंपळनेर नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ विजया चौरे यांचा विजय झाला आहे. पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला असून शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना हा मोठा धक्का आहे. पिंपळनेर नगरपरिषद पहिलीच निवडणूक भाजपने काबीज केली आहे.

यवतमाळ- ढाणकी नगरपंचायत मधील विजयी उमेदवारांची नावे

  • निमलवाड परमेश्वर गंभीर, भाजप
  • रातोळे नागनाथ संभाजी, भाजप
  • कांबळे सारिका विनोद, भाजप
  • चंद्र मल्हार महेश, , भाजप
  • योगेवार उमेश गंगाधर, भाजप
  • रहमान यास्मिन अख्तर मुनव्वर, MIM
  • ढोबळे रविशंकर गुणाजी, शिवसेना शिंदे गट
  • शेख नफीसाबी इमरान, काँग्रेस
  • प्रफुल सुभाष चौरे, शिवसेना शिंदे गट

नेवासा नगरपालिका

माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला. 17 पैकी 10 जागांवर गडाखांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. 6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून एका जागेवर आम आदमी पार्टीचा विजय झाला.

देवळाली प्रवरा नगरपालिका

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम विजयी झाले. 14 जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाले असून काँग्रेसचा चार जागांवर विजय झाला.

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या होम पिचवर खडसे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा 2561 मतांनी विजय झाला.

जळगाव, नशिराबाद नगरपंचायत

भाजपचे उमेदवार योगेश नारायण पाटील 991 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणेश चव्हाण यांचा पराभव झाला.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा