….म्हणून अजित पवारांनी गांधी टोपी घातली!

बारामती: “आज कदाचित लोकांना वाटलं असेल आम्ही टोपी कशी घातली. ही सिल्कची टोपी असून रेशिम कोषापासून या टोपीसह अन्य कपडेही तयार होतात. याचीच माहिती व्हावी यासाठी आयोजकांनी बारामतीकर म्हणून आपल्याला आणि इंदापूरकर म्हणून दत्तात्रय भरणे यांना टोपी घातली. लोकांमध्ये गैरसमज व्हायला नको असं सांगत बारामतीतल्या रेशिम कोष खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधी […]

....म्हणून अजित पवारांनी गांधी टोपी घातली!
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:32 PM

बारामती: “आज कदाचित लोकांना वाटलं असेल आम्ही टोपी कशी घातली. ही सिल्कची टोपी असून रेशिम कोषापासून या टोपीसह अन्य कपडेही तयार होतात. याचीच माहिती व्हावी यासाठी आयोजकांनी बारामतीकर म्हणून आपल्याला आणि इंदापूरकर म्हणून दत्तात्रय भरणे यांना टोपी घातली. लोकांमध्ये गैरसमज व्हायला नको असं सांगत बारामतीतल्या रेशिम कोष खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधी टोपी घातल्याचं कारण स्पष्ट करताच, उपस्थितांमध्ये हशा पिकला.

बारामतीत आज बाजार समितीच्या माध्यमातून रेशिम कोष खरेदी केंद्राचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालं. भाषण झाल्यानंतर सत्काराच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या अजित पवार यांनी अचानक माईकचा ताबा घेत गांधी टोपी घातल्याचं कारण स्पष्ट केलं. आपल्या खास शैलीत बोलताना अजित पवार यांनी रेशिम कोषापासून धागा तयार होऊन त्यापासून बनवल्या जाणार्‍या कापडाची ही टोपी असल्याचं सांगितलं. यापासून वेगवेगळे कपडेही तयार होतात. हे लोकांना समजावं म्हणून आपण आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी टोपी घातलीय.. नाहीतर लोकांमध्ये वेगळाच गैरसमज व्हायचा असं सांगायलाही ते विसरले नाहीत..

बारामतीतल्या जोशी समाजाचे लोक अनेक ठिकाणी भविष्य सांगून उदरनिर्वाह करतात. याबाबत बोलताना अजित पवार यांनी चांगलीच कोटी केली. आपल्याला हे लोक कोल्हापूरमध्ये भेटले. ते आपल्या खास शैलीत बोलून बरोबर समोरच्या व्यक्तीला खूश करतात. इतकंच काय तर त्यांच्या समस्यांचीही माहिती देऊन समोरच्या व्यक्तीला खूश ठेवतात. त्यामुळं काही ना काही त्रासात असलेली व्यक्ती भविष्य जाणून घेणारी अचंबित होते. ही त्यांची कला असल्यानं त्यांना पैसेही चांगले मिळतात, असं सांगत अजित पवार यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें