यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर का दाखल झाला? जाणून घ्या हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?
राज्यात यंदा तब्बल बारा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे, मे महिन्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामागे नेमकं काय कारण आहे? ते जाणून घेऊयात

यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. यावर्षीत तब्बल 12 दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे, यापूर्वी 2009 साली मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला होता, त्यानंतर 16 वर्षांनी मान्सूनचं राज्यात वेळेपूर्वी आगमन झालं आहे. राज्यात मान्सून वेळेपूर्वीच का दाखल झाला? त्या मागे नेमकी काय करणं आहेत? याबाबत हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी माहिती दिली आहे, जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात वेळेच्या आधी मान्सून दाखल होण्याची कारणे जर बघितली तर ती वेगवेगळी आहेत, साधारणतः केरळमध्ये एक जूनपर्यंत मान्सून दाखल होतो, मात्र यंदा 24 मे लाच मान्सून दाखल झाला होता, आणि त्या भागामध्ये जी सिस्टीम बनली होती त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मध्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या भागामध्ये पावसाची शक्यता वाढली.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे, ते अधिक तीव्र झाल्यानं ती हवा आपल्या महाराष्ट्राकडे आली आणि त्याला अनुकूल असं वातावरण मिळालं, त्यामुळे मान्सून राज्यात लवकर दाखल झाला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा बनला होता, त्यामुळी जी सिस्टीम बनली, ती मध्य महाराष्ट्रापर्यंत, पुण्यापर्यंत पोहोचली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा पाऊस पडला आहे.
अरबी समुद्रात जी सिस्टीम तयार झाली आहे, तिची जी मोमेंट आहे ती महाराष्ट्रासाठी अनुकूल होती. त्यामुळे राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आता सध्या त्या सिस्टीमचा जोर कमी झाला आहे , त्याची तीव्रता कमी झाली आहे, त्यामुळे पावसाचा जोर थोडा कमी होईल मात्र पाऊस सुरूच राहील, पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.
विदर्भात मान्सून दाखल होण्याची तारीख दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान असते, मागील 30 वर्षांचा रेकॉर्ड आपण बघितला तर दहा ते पंधरा जून दरम्यान मान्सून विदर्भात दाखल झाला आहे, मात्र यंदा विदर्भात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट या जिल्ह्यांसाठी जाहीर केलेला आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
