AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar | रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांना येत्या बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rohit Pawar | रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 19, 2024 | 6:35 PM
Share

मुंबई | 19 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी धाड टाकली होती. यामध्ये पुणे, बारामती येथील बारामती अ‍ॅग्रोचे कार्यालय तसेच छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्याचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली होती. रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने ही कारवाई केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीका केली होती. त्यांनी या कारवाईमागे अजित पवार गटावर आरोप केला होता. अजित पवार मित्र मंडळ दिल्लीला जावून आल्यानंतर ही कारवाई झाल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. विशेष म्हणजे या कारवाईनंतर रोहित पवार यांना आता ईडीने समन्स बजावल्याची बातमी समोर आली आहे.

ईडीने रोहित पवार यांना येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. त्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरं जातात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ईडीने रोहित पवार यांना नेमकं कोणत्या कारणास्तव समन्स बजावलं आहे? असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित पवार यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शिखर बँकेकडून कन्नड सहकारी साखर कारखान्याप्रकरणी झालेल्या लिलावा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोने या कारखान्याची खरेदी केली होती. बारामती अ‍ॅग्रोने 50 कोटी रुपयांत कन्नड सहकारी साखर कारखान्याची बँक लिलावातून खरेदी केली होती. पण या लिलावात सहभागी असलेल्या कंपनी बारामती अ‍ॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच प्रकरणावर बोट ठेवत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला होता”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तसेच या प्रकरणी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?