सीजेपी आंदोलनामागे मोठं षडयंत्र, प्रचंड पैसा खर्च; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, म्हणाले- देशाची काळजी…

Sujay Vikhe Patil Alleges Conspiracy and Massive Funding Behind CJP Protest: सुजय विखे पाटलांनी अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप केले आहेत. ऊसदरावरही भूमिका मांडली आहे. यानंतर चर्चा सुरू झाली आहे.

सीजेपी आंदोलनामागे मोठं षडयंत्र, प्रचंड पैसा खर्च; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, म्हणाले- देशाची काळजी...
Sujay Vikhe Targets Congress and CJP
| Updated on: Nov 22, 2026 | 11:51 PM

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये विविध राजकीय आणि शेतकरी प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस, सीजेपीचे आंदोलन, ऊसदराचा प्रश्न आणि भाजपच्या पदयात्रेबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. सीजेपीच्या आंदोलनामागे मोठं षडयंत्र असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच सीजेपीचे आंदोलन आणि विरोधकांच्या भूमिकेला जनता निवडणुकीतून उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सीजेपीच्या अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर बोलताना सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अभिजीत दिपके हे अनेक वर्षांपासून देशात राहत नाहीत, त्यांना अचानक देशाची काळजी कशी वाटू लागली, असा सवाल त्यांनी केला. आपल्या शेजाऱ्याचे कूपन काढण्यासाठीही मदत न करणारे दिपके आता देशाला शहाणपण शिकवायला निघाले आहेत, अशी टीका विखे यांनी केली. या आंदोलनामागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचे स्पष्ट दिसत असून त्यासाठी मोठा पैसा खर्च होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊसदराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांनी ऊसदराच्या गणितावर भाष्य केले. यंदाचा गळीत हंगाम संपेपर्यंत साखरेचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले आणि उसाची रिकव्हरी सव्वा अकरा ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत राहिली, तर साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 3500 ते 3600 रुपये दर देण्यात अडचण येणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, सध्या साखरेचे दर पाच हजार रुपयांच्या खाली आल्याने साखरेच्या दरावर आधारित ऊसदर जाहीर करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे अहिल्यानगर भाजपच्या वतीने शहरात ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रा काढण्यात आली. दिल्ली गेट परिसरात या पदयात्रेची सांगता जाहीर सभेने झाली. काँग्रेस, सीजेपी आणि विरोधकांकडून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विखे यांनी केला. त्याला विरोध दर्शवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा असल्याचा संदेश या पदयात्रेतून देण्याचा प्रयत्न केल्याचेही सुजय विखे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us