AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा अंदाज लावायला मी फार लहान माणूस, त्यांचं जवळं येणं म्हणजे.., भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएसोबत जाणार आहे, अशी चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या बड्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे.

शरद पवारांचा अंदाज लावायला मी फार लहान माणूस, त्यांचं जवळं येणं म्हणजे.., भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 12:40 PM
Share

बुधवारी दिल्लीतील  महाराष्ट्र सदनमध्ये जलजीवन मिशनची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेते विनोद तावडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीनंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीमधून रवाना झाले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच शरद पवार यांचा अंदाज लावण्यासाठी मी फार लहान माणूस आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले दरेकर? 

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे दोन्ही नेते महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नावर जलसंधरणासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, आणि या बैठकीनंतर जर या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला असेल तर त्याचा आनंदच व्हायला पाहिजे, त्यामध्ये चर्चा रंगण्याचं काहीच कारण नाही. उलट आपण याचं स्वागत केलं पाहिजे. की महाराष्ट्रामधील लोकं हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी देखील राजकीय मतभेद विसरून, विकासाच्या कामासाठी एकत्र येत आहेत, अशा अर्थाने आपण या भेटीकडे पाहिलं पाहिजे, त्यामुळे या दोन्ही नेत्याचा प्रवास असेल, भेटणं असेल हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचच असेल. त्यामध्ये दुसरा कोणता राजकीय अर्थ दडला असेल असं मला वाटत नाही, असं यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाची एनडीमधील घटक पक्षांसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जवळीक वाढत असेल तर चांगलंच आहे, शरद पवार हे ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत. ते जर त्याठिकाणी मोदी साहेबांना भेटले असतील, आणि त्यातून जर चांगलं वातावरण तयार होऊन महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे.

आता पवार साहेबांचं जवळ येणं आणि जाणं, याचा अंदाज लावायला मी तर फार लहान माणूस आहे. त्यांचा अंदाज जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा आपण जुने अंदाज पहातो. अरे त्यावेळी असं झालं होतं, त्यामुळे मोठ्या नेत्यांना अजून पवार साहेब कळले नाहीत, त्यामुळे मी त्यांच्यावर ठाम असं भाष्य करणं मला वाटतं घाईचं होईल, असं यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?